
लोहारा-प्रतिनिधी
Frank Water , ACWADAM व ज्ञान प्रबोधिनी संस्था यांच्या समन्वयातून सन २०२३ पासून पाण्याची गुणवत्ता या विषयाच्या अनुषंगाने धाराशिव जिल्हातील वाखरवाडी, ढोकी ( ता. धाराशिव – ढोकी गावसमुह), आरळी ( ता. तुळजापुर), दक्षिण जेवळी ( ता. लोहारा – हराळी गावसमुह ) व शिरसाव ( ता. परंडा) या ५ गावात काम चालू आहे. या प्रत्येक गावातील उन्हाळ्यात व पावसाळ्यात काही पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणी करुन त्याचे रिपोर्ट गाव स्तरावर सांगण्यात आले. Household Survey, पर्जन्यमानाच्या व विहिरींच्या पाणी पातळीच्या नोंदी स्थानिक व्यक्तींच्या माध्यमातून घेण्यात आल्या. याचाच पुढील टप्पा म्हणून आज जिल्हास्तरीय “जनसहभागतून जल जागरण” कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परिसर धाराशिव येथील जल व भूमी व्यवस्थापन विभागाच्या समन्वयातून नव्याने प्रश्न जाणवलेल्या पाटील तांड्यासह एकूण ६ गावातील ७३ ग्रामस्थांची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून Frank Water संस्थेच्या CEO- कटी ऍलकॉट प्रवीणा श्रीधर, ऋतू शंकर बांदा, Acwadam संस्थेच्या प्रमुख उमा असलेकर, मृत्युजय विचारे, जल व भूमी व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. नितीन पाटील, ज्ञान प्रबोधिनी संस्था हराळी केंद्राचे प्रमुख अभिजित कापरे उपस्थित होते. एक दिवसीय कार्यशाळेत प्रकल्पाचा उद्देश, प्रकल्पाचा आढावा, पाणी व आरोग्य विषयक मार्गदर्शन, सर्व्हे केलेल्या आशा कार्यकर्त्या व महिला प्रतिनिधी यांचे अनुभवकथन, शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून पाण्याच्या गुणवत्तेसंदर्भात चालू असलेले कार्य, तज्ञ व्यक्तींचे अनुभवकथन ( TISS, AFARM, कॅन्सर हॉस्पिटल बार्शी, लोकप्रतिनिधी ) इ. सत्र घेण्यात आले. ज्यात डॉ. शुखदा कुलकर्णी, डॉ. नितीन पाटील, पाणी पुरवठा विभागांचे संजय जाधव, मा. गणेश चादरे, गोरेवाडीचे सरपंच प्रितम नाडे यांचा सहभाग होता. मध्यंतरी प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन झाले. शेवटी ज्ञान प्रबोधिनी संस्था हराळी केंद्राचे प्रमुख मा. अभिजित कापरे यांनी मार्गदर्शन करुन पुढील काळात गावकऱ्यांनी एकत्र येऊन पाणी समितीच्या माध्यमातून ह्या प्रश्नांचा पाठपुरावा करावा असे आवाहन करण्यात आले.शेवटी धाराशिव जिल्हाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मौनिक घोष सर यांना कार्यशाळेविषयी माहिती देण्यात आली.ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी ज्ञान प्रबोधिनी चे ढोकी गाव समुहातील उत्तरदायी सदस्य महेश कावळे, प्रफुल्ल पाटील, लहू शिंदे, किरण पवार, आशा कदम, आलका कावळे, जयश्री चोबे, यांच्यासह स्थानीक ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.सुत्र संचालन सचिन सुर्यवंशी यांनी केले