उमरगा – लोहारा विधान सभा मतदार संघात भारतीय जनता पार्टीचे 50 हजार सभासद नोंदणी पुर्ण करावी — बहुजन कल्याण, दुग्ध व्यवसाय अपारंपारिक उर्जा मंत्री अतुल सावे
Post -गणेश खबोले

लोहारा/प्रतिनिधी
उमरगा – लोहारा विधान सभा मतदार संघात भारतीय जनता पार्टीचे 50 हजार सभासद नोंदणी पुर्ण करा, आपण टार्गेट पुर्ण केल्यास या मतदार संघासाठी विशेष विकास निधी देण्यासाठी मी स्वतः शिफारस करणार असल्याचे बहुजन कल्याण, दुग्ध व्यवसाय अपारंपारिक उर्जा मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. लोहारा शहरातील सप्तरंग मंगल कार्यालयात दि.6 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 1 वाजता भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख म्हणुन मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे, भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रदिप शिंदे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष माधव पवार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य गुलकंद व्यवहारे, भाजपा
लोहारा तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे,
उमरगा तालुकाध्यक्ष शहाजी पाटील,
व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत मनीयार, जिल्हा कोषाध्यक्ष नेताजी शिंदे, अदि उपस्थित होते. पुढे बोलताना मंत्री अतुल सावे म्हणाले की, जिल्हा परिषद पंचायत समिती, नगरपंचायत निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन योग्य नियोजन करून सभासद नोंदणी करून घ्यावी. तिकीट वाटपाच्यावेळी सभासद नोंदणीचे काम विचारात घेतले जाणार आहे. भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांना बळ देणारी पार्टी आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने 500 सभासद नोंदणीचे उद्दीष्ट घेऊन कामाला लागावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
______________________________
मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे यांनी उमरगा, लोहारा तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी केलेल्या सभासद नोंदणीचा आढावा घेतला. ज्यांनी सभासद नोंदणी केली नाही त्यांनी किमान 50 सभासद नोंदणी करून सक्रीय सभासद व्हावे. नाहीतर यापुढे त्यांना कुठलेही पद देऊ नये, अशा सुचना जिल्हा अध्यक्ष संताजी चालुक्य यांना दिल्या.
_______________________________
यावेळी कास्ती, उंडरगाव, कानेगाव, मार्डी, खेड, अदि गावातील युवक, महिला व नागरिकांनी भाजपा पक्षात प्रवेश केला.
_______________________________
या कार्यक्रमाचे प्रस्ताविकपर मार्गदर्शन जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांनी केले. सुत्रसंचालन विक्रांत संगशेट्टी यांनी केले. या कार्यक्रमास जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, तालुका सरचिटणीस इक्बाल मुल्ला, तालुका सरचिटणीस दगडू तिगाडे, तालुका उपाध्यक्ष संपत देवकर, तालुका उपाध्यक्ष दिलीप पवार, तालुका उपाध्यक्ष बसवराज कोंडे, विठ्ठल चिंकुद्रे, युवा मोर्चा शहराध्यक्ष बाबा सुंबेकर, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष सौरभ कागे, माजी तालुकाध्यक्ष अनिल ओवांडकर, जिल्हा चिटणिस मुरलीधर होणाळकर, प्रसिद्धी प्रमुख निकेश बचाटे, संजय कदम, लोकेश बिराजदार, तालुका सरचिटणीस सागर पाटील, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस सुयेश दंडगुले, बालाजी सोनटक्के, संजय कदम, मल्लीनाथ फावडे, सरपंच मनिषा काळप्पा, रोहित सिरसाठ, आकाश आष्टे, शिवहारे आबा सांळुके, दत्ता कडबाने, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.