तुळजापूर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार अमीर शेख यांच्या प्रचाराला ७२ गावातूनगती, महिलावर्गांचा चांगला प्रतिसाद
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

तुळजापूर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार अमीर शेख यांच्या प्रचाराला ७२ गावातूनगती, महिलावर्गांचा चांगला प्रतिसाद
मतदारांना दूरध्वनी टेलिफोन ला मतदान करण्यासाठी अवाहन
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचारातील चुरस शिगेला पोहोचली आहे. यादरम्यान अपक्ष उमेदवार अमीर शेख यांचा गावो गावी जाऊन महिलांना व जेष्ठ नागरिकांना संवाद साधून प्रत्येक गावातून आपली विचार मांडत भव्य पदयात्रा काढून प्रत्येकाच्या अडचणी जाणून प्रत्येकाचा आशीर्वाद घेऊन प्रचार करीत आहे. तुळजापूर मतदारसंघातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.
आपला प्रचार अधिक गतिमान करून बेंबळी, ताकवीकी, केशेगाव, आपसिंगा, ढेकरी, कामठा, कात्री या ग्रामीण भागामध्ये आपली लोकप्रियता वाढवली आहे.
नोकरी शिल्लक नाहीत किंवा नोकऱ्या शिल्लक असल्या तरी त्या भरल्या जात नाहीत. आणि या नोकऱ्या न भरल्यामुळे शिकलेले तरुण देखील बेरोजगार म्हणून फिरत आहेत. त्यामुळे त्यांचे कौटुंबिक स्वास्थ बिघडले जाते आहे.या सामाजिक समस्येकडे राजकिय पक्ष पाहत नाही म्हणून आपण अपक्ष उमेदवार अमीर शेख यांनी युवकांची भूमिका समजून घेऊन पुढील काळामध्ये युवकांच्या भवितव्यासाठी काहीतरी भरीव काम करण्याचा निश्चय या निवडणुकीच्या दरम्यान केला आहे.अमीर शेख यांचा अनुक्रमांक बारा असुन कुणारे बारा वाजतील हे येत्या २० नोव्हेंबर ला पाहणे गरजेचे आहे.चिन्ह आहे दुरध्वनी ,मतदारांना दूरध्वनी टेलिफोन ला मतदान करण्यासाठी अवाहन करत आहेत असे देखील यावेळी उमेदवार अमीर शेख यांनी बोलताना सांगितले.