लोहारा शहराच्या सर्वागीण विकासासाठी जनतेने आ.ज्ञानराज चौगुले यांना परत विधानसभेत पाठवाण्याचे गटनेत्या सारिका बंगले यांचे आवाहन
Post-गणेश खबोले

लोहारा/प्रतिनिधी
लोहारा शहरातील सर्वागीण विकासासाठी जनतेने आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठीशी उभे रहावे असे आवाहन नगरसेविका तथा नगरपंचायतीच्या गटनेत्या सारिका प्रमोद बंगले व भाजपा लोहारा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला यांनी केले.
गटनेत्या सारिका बंगले व इकबाल मुल्ला बोलताना म्हणाले कि,आ.ज्ञानराज चौगुले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महायुतीकडे सातत्याने पाठपुरावा करुण मागील अडीच वर्षाच्या कालावधीत कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून लोहारा शहराचा सर्वांगीण विकास केला आहे. सर्व समाजाला निधी उपलब्ध करुण देऊन विकास करुण लोहारा शहराचा चेअरा मोहरा बदलला आहे. विकास आणि प्रगतीचा हा प्रवाह कायम राहावा, यासाठी मतदार राजांनी ज्ञानराज चौगुले यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहान केले.
महायुतीचे अधिकृत उमेदवार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रचारार्थ लोहारा शहरातील प्रभाग क्रं.8 मध्ये दि.14 नोव्हेंबर 2024 रोजी प्रभागातील युवकांना सोबत घेऊन आ.ज्ञानराज चौगुले यांनी विकास केलेल्या कामाचे माहिती पुस्तक व पत्रके वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रभागातुन उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी प्रमुख म्हणुन गटनेत्या सारिका बंगले, भाजपा लोहारा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, नगरसेविका संगिता किशोर पाटील, के.डी.पाटील, उपस्थित होते.
यावेळी भाजपाचे कार्यकर्ते प्रशांत माळवदकर, गजानन बंगले, रोहन खराडे, जलाल मुल्ला, गौरव तोडकरी, सुदर्शन क्षीरसागर, यश जट्टे, आकाश लामतुरे, प्रसाद जट्टे, ओम जट्टे, रुकिषेक बंगले, रोहन खराडे, शिव कुमार जट्टे, यांच्यासह युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.