महाविकास आघाडीचे धिरज पाटील यांना तर दहा बारा किमी अंतराच्या पुढे कोणीन्ही ओळखत नाही – विजयसर गंगणे
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

महाविकास आघाडीचे धिरज पाटील यांना तर दहा बारा किमी अंतराच्या पुढे कोणीन्ही ओळखत नाही – विजयसर गंगणे
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
महाविकास आघाडीचे धिरज पाटील यांना तर दहा बारा किमी अंतराच्या पुढे कोणीन्ही ओळखत नाही. आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदपार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या समोर तर कोणताच उमेदवार टिकणार नाही.भाजपाचे नेते कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विजयसर गंगणे यांनी पत्रकार परिषद घेवून धिरज पाटलावर केली टिका
भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष असलेले काँग्रेस चे उमेदवार धिरज पाटील पाळीकर पुजारी, उपाध्ये तसेच सेवेकरी यांचा हिताचे काय निर्णय घेतील? असा सवाल भाजप नेते विजय गंगणे यांनी विचारला आहे. शहरातील एका हाॅटेल मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बाजार समितीचे माजी सभापती गंगणे बोलत होते. पुढे बोलतांना गंगणे यांनी जाती – धर्म, शहरातील, बाहेरचा आदि विषय बाजूला ठेवून विकासाचा बाजूने मतदान करण्याचे आवाहन गंगणे यांनी यावेळी बोलतांना मतदारांना आव्हाण केले. जिल्हा परिषद अध्यक्ष असताना तालुक्यात एकही उद्योग, योजना न राबवणारे जिल्ह्यात लघु उद्योग आणण्याचा वल्गना करून नागरिकांत गैरसमज पसरवत असल्याचा आरोप गंगणे यांनी यावेळी बोलतांना केला. लाडकी बहीण योजने विरोधात न्यायालयात धाव घेणारे, लाडकी बहीण योजना निधी अभावी बंद पडणार असल्याचे सांगणारे महिलांना दरमहा ३ हजार रूपये कुठून देणार असा सवाल गंगणे यांनी यावेळी विरोधकाना विचारला. शहरातील सर्व पुजारी बांधव तसेच पुजाऱ्यांचा लेकी सुनांसाठी तुळजाभवानी मातेचा दर्शनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार असल्याची ग्वाही विजय गंगणे यांनी दिली आहे. विकासाच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन गंगणे यांनी यावेळी बोलतांना केले.