ब्रेकिंगमहाराष्ट्र
तुळजापूर येथे पोलीस महानिरीक्षकांकडून ईव्हीएम स्ट्रॉगरूमची पाहणी – उपविभागीय अधिकारी डॉ. संजयकुमार डव्हळे
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

तुळजापूर येथे पोलीस महानिरीक्षकांकडून ईव्हीएम स्ट्रॉगरूमची पाहणी –
उपविभागीय अधिकारी डॉ. संजयकुमार डव्हळे
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर विधानसभा मतदार संघातील नळदुर्ग रोडवरील श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्पोर्टस हॉलमध्ये तयार करण्यात आलेल्या ईव्हीएम स्ट्राँगरुमची पोलीस महानिरीक्षक (DCP) वीरेंद्र मिश्रा यांनी मंगळवारी दि.१२ नोव्हेंबर रोजी दुपारी पाहणी केली.
यावेळी महानिरीक्षक(DCP) मिश्रा यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. संजयकुमार डव्हळे यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी पोलीस अधिक्षक संजय जाधव यांच्यासह पोलीस व निवडणूक विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.