उध्दव ठाकरे यांच्या प्रचारसभेला मोठ्या संख्येने प्रतिसाद… गद्दारांना पाडा ॲड धिरज पाटलांना निवडुन आणा.
गद्दारांना पाडा ॲड धिरज पाटलांना निवडुन आणा.

उध्दव ठाकरे यांच्या प्रचारसभेला मोठ्या संख्येने प्रतिसाद…
गद्दारांना पाडा ॲड धिरज पाटलांना निवडुन आणा.
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार कुलदीप उर्फ धीरज पाटील व आमदार कैलास पाटीलयांच्या प्रचारार्थ शिवसेनेची मुलूख मैदानी तोफ माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी ज्या गद्दारांना तुम्ही धाराशिवकरांनी आमदार केले तेच राष्ट्रवादीला सोडून भाजपात सामील झाले अन् भाजपाचा झेंडा घेतला त्या आमदाराला तुळजापूर तालुक्यानी निवडून आनल त्या गद्दाराला गाडा असे आपल्या ठाकरे शैलीतून एकेरी उल्लेख करत सडेतोड उत्तर देत अनेक मुद्याला हात घालत धाराशिवच्या आमदाराने मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसून (शरद पवार राष्ट्रवादी )यांना सोडून भाजपात सामील झाले अशा गद्दार आमदारांना त्याची जागा दाखवा अन धिरज पाटील यांना निवडून आणा. असे आवाहन करीत आमदारांचा लेखाजोका मतदारा समोर मांडुन मिंदे सरकारच्या काळात महागाईचा आगडोंब उसळला आहे. राज्यात महाविकास आघाडी येताच प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचे शिवस्मारक बांधणार, जिवन अवश्यक वस्तूचे भाव स्थिर ठेवून मुलींबरोबर मुलांना सुध्दा मोफत शिक्षण देणारं, महिलांना महिना तीन हजार रुपये देणार
सुशिक्षित बेरोजगारांना कामे देऊ असे आवाहन मतदारांना केले. या वेळी धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्थानिक आमदार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक कामाचं नुसतं उद्घाटन करीत सुटलेले राणाजगजितसिंह पाटील हे ५ वर्षांपासून कृष्णा खोरे धरणाचे पाणी तुळजापूर – धाराशिव शहराला आल्याशिवाय मत मागणार नाही असं ठणकावून सांगत होते मग कोठे आहे पाणी. महाराष्ट्रात लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर लोकसभे प्रमाणे विधानसभेत सुध्दा परिवर्तन घडवा. कारण हे सरकार घटना बाह्य सरकारने खरे शिवसेनेचे धनुष्यबाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चोरले
निकाल न देता तारीख पे तारीख दिली जात आहे. खरी शिवसेना कुणाची आहे हे यावरून येणाऱ्या २० तारखेला दाखवून द्या याला खरी कारणीभूत पंतप्रधान मोदी व अमित शहा आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. अनेक उद्योग धंदे गुजरातला हलवले महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचे शडयंत्र आहे ते हाणून पाडण्यासाठी येणाऱ्या २० तारखेला महाविकास आघाडीचा उमेदवार ॲड धिरज पाटील यांना भरघोस मतांनी निवडून द्या अन् तालुक्याचा विकास घ्या असे आवाहन केले.
ठाकरे शिवसेनेवर प्रेम करणारे निष्ठावंत शिवसैनिक मोठा जनसमुदाय उपस्थित होता.