
लोहारा -प्रतिनिधी
मुलाच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त लोहारा येथील शेतकरी मल्लिनाथ घोंगडे यांनी नवरात्र निमित्त सुरू असलेल्या तुळजाभवानी अन्नछत्र मंडळातुन एक दिवसीय सेवा देत अन्नदान केले.
शेतकरी मल्लिनाथ घोंगडे यांच्या मुलाचे केदार मल्लिनाथ घोंगडे याचे दि.५ ऑक्टोबर रोजी प्रथम होते. पुण्यस्मरण निमित्त अनावश्यक खर्च टाळून गेल्या १९ वर्षा पासुन महाराष्ट्र कर्नाटक, तेलंगणा राज्यातून तुळजापूर ला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी लोहारा शहरात सुरू असलेल्या तुळजाभवानी अन्नछत्र ला एक दिवसाची सेवा देत अन्नदान केले.
यावेळी केडी पाटील, मल्लिकार्जुन पाटील, सलीम शेख, रघुवीर घोडके, बसवराज पाटील,दत्ता वाघ,श्रीकांत भरारे,विक्रांत संगशेट्टी,मल्लिनाथ घोंगडे,पत्रकार निळकंठ कांबळे, बालाजी बिराजदार,सुमित झिंगाडे,गणेश खबोले,भागवत गरड,कल्याण ढगे,गोपाळ संदिकर,पिंटू चिकटे,वाघ सर आदी उपस्थित होते.
