मार्डी येथील जि.प.प्रा.शाळेतील शिक्षक दत्तात्रय क्षीरसागर सेवानिवृत्त झाल्याबद्दल सत्कार
Post-गणेश खबोले

लोहारा/प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील मार्डी येथील जि.प. प्रा.शाळेतील शिक्षक दत्तात्रय क्षीरसागर सेवानिवृत्त झाल्याबद्दल जि.प.प्रा.शाळा, शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतीच्या वतीने दि.1 मार्च 2025 रोजी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष तेजकुमार देवकर होते तर प्रमुख म्हणुन माजी सरपंच आण्णासाहेब पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष आप्पासाहेब देवकर, नगरसेवक अविनाश माळी (लोहारा), पोलिस पाटील संजय नरगाळे (हिप्परगा रवा), मुख्याध्यापक रामलु बोधनपोड, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, अशोक क्षीरसागर, कमलाबाई क्षीरसागर, भिमराव फुलसुंदर, इंद्रजित क्षीरसागर, शिक्षक कैलास माणिकशेट्टी, रमाकांत खटके, निर्मळा दंतकाळे, नाजेमाबेगम पठाण, रामहरी जाधव, राजेंद्र क्षीरसागर, अमोल माळी, धनराज देवकर, रवि कोकरे सुग्रीव क्षिरसागर, भिमराव फुलसुंदर, अमर फुलसुंदर, विशाल फुलसुंदर, शुभम गुरव, अदि उपस्थित होते. यावेळी लोहारा शहर यांच्यावतीने नगरसेवक अविनाश माळी व नातेवाईक भिमराव फुलसुंदर, यांच्यासह मित्र परिवारांच्या वतीने दत्तात्रय क्षीरसागर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ, विद्यार्थी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.