छत्रपती शिवाजी महाराज,राष्ट्रसंत गाडगेबाबा,संत रोहिदास यांची जयंती संयुक्तपणे हराळी येथे साजरी…
Post-गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील हराळी येथे कुळवाडी भुषण छत्रपती शिवाजी महाराज,राष्ट्रसंत गाडगेबाबा,संत रोहिदास यांची जयंती संयुक्तपणे साजरी करण्यात आली.संभाजी ब्रिगेड तालुका कार्याध्यक्ष अभिजित सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त पणे जयंती साजरी करण्यात आली.
महापुरूषांच्या विचारातून प्रेरणा घेवून आम्ही मानवता हाच खरा धर्म म्हणून पाहिलं पाहिजे महापुरूषांच्या जयंत्या नाचून नाही तर प्रबोधन कार्यक्रमाने झाल्या पाहिजेत. महामानवानी मांडलेले विचार आचरणात आणले पाहिजेत.तेच खर त्यांना अभिवादन होईल.असे मत व्याख्यात्या रंजनाताई श्रीकांत हासुरे यांनी यावेळी आयोजित व्याख्यान दरम्यान केले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष धनराज बिराजदार उपस्थित होते. हराळी सरपंच शारदाबाई सूर्यवंशी,तंटामुक्त समिती उपाध्यक्ष हराळी धनराज सुर्यवंशी,ग्रामपंचायत सदस्य कविता धाडवे,सुलोचना बिराजदार,बालाजी यादव,संजय धाडवे,भैया धाडवे,सुनील कांबळे,अजय अमोल सुर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.