
लोहारा- प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे उत्कर्ष या राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन उच्च व तंत्र शिक्षण विभागाने २३ ते २५ फेब्रुवारी दरम्यान केले होते. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील १६ विद्यापीठातून ३२० रासेयोचे स्वयंसेवक सहभागी होणार आहेत.सदर स्पर्धेसाठी भानुदासराव चव्हाण महाविद्यालय,लोहारा येथील संजीवनी गिल्डा व स्नेहा माळी या दोन स्वयंसेवकांची निवड डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल म.शि.प्र.मंडळाचे अध्यक्ष प्रकाश सोळंके,सचिव आ.सतीश चव्हाण,म. वि.समिती अध्यक्ष प्रा.सतीश इंगळे, प्राचार्य डॉ.रामदास ढोकळे,प्रा स्वाती निकम कार्यक्रमाधिकारी डॉ.महानंदा मोरे, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.