
लोहारा-प्रतिनिधी
लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतीदिनानिमित्त मरणोत्तर नेत्रदान शिबिराचे दि.२८ रोजी आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ग्रामीण रुग्णालय लोहारा येथील नेत्र चिकित्सा अधिकारी डॉ.दस्तगीर मुजावर यांची प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी डॉ.मुजावर म्हणाले की,एकूण लोकांच्या ६०% लोकांना नेत्रव्यधत्व आहे आणि हे व्यधत्व १८ वर्षाखालील मुलांमध्ये सगळ्यात जास्त बघावयास मिळते. म्हणून मरणोत्तर नेत्रदान करणे आवश्यक झाले आहे.नेत्रदान कधी करावे,कसे करावे,कोणाला करावे यांचेही सखोल मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.रामदास ढोकळे हे होते.त्यांनी नेत्रदानासंबंधी समाजात अनेक गैरसमज आहेत ते दूर करून येणाऱ्या काळात तरुणांनी पुढे येऊन मरणोत्तर नेत्रदान चळवळ प्रभावी करून मरणोत्तर नेत्रदान करण्यास लोकांना प्रोत्साहित करावे.असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.महानंदा मोरे तर सूत्रसंचालन व आभार डॉ.व्यंकट चिकटे यांनी मांनले यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,रासेयो स्वयंसेवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.