
लोहारा-प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलवाडी येथील शिक्षिका सुनंदा निर्मळे यांचा लोहारा येथील गुरुकुल कोचिंग अकॅडमी यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी रूपाली माळी,ललिता रोडगे,अक्षता माळवदकर,पूजा डाळिंबकर,आकाश निर्मळे,सोमनाथ माळी,भीमाशंकर डोकडे,बब्रुवान बादुले,कैलास माणिकशेट्टी,मल्लिकार्जुन कलशेट्टी आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा याबद्दल सुनंदा निर्मळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली माळी यांनी केले.