तुळजापूर तालुका पाच वर्षात विकासात मागे पडला – माजी मंत्री मधुकरराव चव्हाण
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी तुळजापूर

तुळजापूर तालुका पाच वर्षात विकासात मागे पडला – माजी मंत्री मधुकरराव चव्हाण
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्याच्या विकासाचे प्रश्न विशेषता कृष्णा खोरे 21 टीएमसी पाणी शेतकऱ्याला मिळवून देण्यासाठी आगामी काळात संघर्ष करण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत असे उद्गार माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी देवसिंगा तुळ येथील कार्यकर्ता संवाद मेळाव्यामध्ये काढले. मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित होते. काँग्रेस पक्षाचे झेंडे, गळ्यामध्ये घातलेले गमजे आणि काँग्रेस पक्षाचा विजय असोचा घोषणांनी परिसर दणाणून निघाला.
देवसिंगा तूळ ता. तुळजापूर येथे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता संवाद मिळाव्यात माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार, जिल्हा परिषद माजी सभापती मुकुंद डोंगरे, युवक काँग्रेसचे प्रदेश चिटणीस अभिजीत चव्हाण, काँग्रेसचे नेते ऋषिकेश मगर, पं.स माजी सभापती. शिवाजी गायकवाड, प्रकाश चव्हाण, प्रा. मोहन कचरे, माजी सरपंच रामेश्वर तोडकरी, सरपंच दत्तात्रय मस्के, गौरीशंकर कोडगिरे रसिक वाले संगाप्पा हगलगुंडे, आपू घमुरे, अंकुश पाटील अण्णासाहेब भोसले दादासाहेब चौधरी, हरिभाऊ भोसले, अमर माने अरुण कोळगे,, संभाजी भोसले भास्कर सगट बालाजी भोसले तानाजी जाधव यांची याप्रसंगी उपस्थिती होती. सरपंच आणि इतर सदस्य यांनी या मेळाव्यामध्ये माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे स्वागत केले. प्रारंभी पं.स. माजी सभापती शिवाजी गायकवाड यांनी मेळाव्याचे प्रास्ताविक केले. यावेळी प्राध्यापक मोहन कचरे, प्रदेश युवक सरचिटणीस अभिजीत चव्हाण, माजी सभापती प्रकाश चव्हाण, यांनी मनोगत व्यक्त केले.
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना आपण खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात हे माझ्यावर व काँग्रेस पक्षावर आपले किती प्रेम आहे हे सिद्ध करते. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण तुळजापूर तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर विकास काम केले. कृषी क्षेत्रामध्ये केलेले काम पिढ्यानपिढ्या सर्वांना काँग्रेसची ओळख करून देण्यासाठी पुरेसे आहे, आपण केलेली विकास कामे आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी केलेली धडपड यामुळे डोंगराळ असणारा आपला तालुका हिरवा गार झाला कोरडवाहू शेती बागायती झाली शेतकऱ्याची उत्पन्न वाढले आणि घराघरांमध्ये प्रगतीचे दिवस नांदू लागले ही किमया केवळ काँग्रेस पक्षाने केलेली आहे. वसंतदादा पाटील, विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण या नेत्यांचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. आगामी काळामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आपण उभे राहणार असून तुळजापूर तालुक्यामध्ये जे विकासाची कामे मागे राहिले आहेत ती पूर्ण करण्यासाठी मला संघर्ष करावा लागणार आहे त्यासाठी आपले मतदान रुपी आशीर्वाद काँग्रेस पक्षाला द्यावेत असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार यांनी याप्रसंगी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या कारकिर्दीचा गौरव केला. मराठवाडा वैज्ञानिक विकास महामंडळ आणि राज्य शासनाच्या माध्यमातून मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मधुकरराव चव्हाण यांनी ग्रामीण भागाच्या विकासाचे महत्वाचे प्रश्न सोडवले. तुळजापूर तालुक्याला 21 टीएमसी पाणी मिळाले पाहिजे या मागणीसाठी मागच्या 25 वर्षांमध्ये त्यांनी सभागृहामध्ये केलेला संघर्ष सर्वांनी पाहिलेला आहे हे पाणी तुळजापुरला आणण्यासाठी मधुकरराव चव्हाण यांच्यासारखा खंबीर नेता आमदार म्हणून असणे गरजेचे आहे. या पाच वर्षांमध्ये तुळजापूर तालुका विकासामध्ये मागे पडला त्याला पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी माजी मंत्री चव्हाण यांनाच उर्वरित काम करावे लागणार आहे असे सांगितले. जि प माजी सभापती मुकुंद डोंगरे यांनी तुळजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये मराठवाड्यातील सगळ्यात जास्त विकासाची कामे झाली आहेत साठवण तलाव आणि शेतीसाठी लागणारे पाणी मधुकरराव चव्हाण यांच्या कामामुळे मिळाले आहे त्यामुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील प्रत्येक माणूस माजी मंत्री चव्हाण यांना कधीच विसरणार नाही येणाऱ्या विधानसभेमध्ये माजी मंत्री चव्हाण यांचाच विजय होणार आहे असे विश्वासाने सांगितले. दादासाहेब चौधरी यांनी सूत्रसंचालन केले व बाजार समितीचे संचालक एडवोकेट रामचंद्र ढवळे यांनी आभार मानले.