श्री तुळजाभवानी देवीचे १९९१-२००९ मध्ये भ्रष्टाचार प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करा – किशोर गंगणे
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

श्री तुळजाभवानी देवीचे १९९१-२००९ मध्ये भ्रष्टाचार प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करा – किशोर गंगणे
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
श्री तुळजाभवानी देवी तुळजापूर येथे १९९१-२००९ मध्ये भ्रष्टाचार प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करणे बाबत दि.२६ ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक संजय जाधव यांना हिंदू जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
संदर्भ १) फौजदारी जनहित याचिका क्रमांक ५/२०२२ त्यातील मा. उच्च न्यायालयाचा निकाल दि. ०९/०५/२०२४ नुसार गुन्हे नोंदवणे.
२) गुन्हे अन्वेषण विभाग, जिल्हा पोलीस प्रमुख शंकर केंगार यांचा अहवाल दि. २२/०९/२०१७
निवेदनात असे नमूद केले आहे की वरील विषयास अनुसरून कृपया मा. उच्च न्यायालयाचा निकाल दि. ०९/०५/२०२४ आदेशा नुसार, व गुन्हे अन्वेषण विभाग, जिल्हा पोलीस प्रमुख शंकर केंगार यांचा अहवाल दि. २२/०९/२०१७ नुसार साडे आठ कोटीचा अपहार करणाऱ्या १६ व्यक्तीविरुद्ध फौजदारी गुन्हे नोंदवावा.
हा भ्रष्टाचार वर्षे १९९१-२००९ चा आहे. माननीय उच्च न्यायालयाने तसे स्पष्ट आदेश दिले आहेत. कृपया अधिक वेळ न दवडता फौजदारी गुन्हे नोंदवा व मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन त्वरित करावे असे असताना देखील बऱ्याच वर्षापासून गुन्हे दाखल होत नाहीत असे या लेखी निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला आहे या निवेदनावर माजी पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे, अमित कदम, ॲड शिरिष कुलकर्णी, अजय साळुंके, विनोद रसाळ, किशोर जगताप यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.