शेतकरी बांधवांना अनुदानापासून दूर न ठेवता शेतकऱ्याला सरसकट सोयाबीन,पिक विमा सरसकट भरलेल्या पिक विम्याच्या पावती आधारे अनुदान देण्यात यावे
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

शेतकरी बांधवांना अनुदानापासून दूर न ठेवता शेतकऱ्याला सरसकट सोयाबीन,पिक विमा सरसकट भरलेल्या पिक विम्याच्या पावती आधारे अनुदान देण्यात यावे
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
धाराशिव जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्याला सन २०२३ च्या पिक पाहणीचे व सात बाराच्या उताऱ्याच्या आधारे ज्यांची यांची नोंद करूनही नोंद दिसत नाही अशा सर्वसामान्य सरसकट शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंद दिसत नाही आश्या शेतकऱ्यांना सरसकट पिक विम्याच्या भरलेल्या पावतीच्या आधारे सरसगट अनुदान द्यावे व प्रत्येक शेतकरी व शेतकऱ्यांना मिळत असलेल्या शासकीय अनुदानापासून वंचित न ठेवता शेतकरी बांधवांना अनुदानापासून दूर न ठेवता सर्वसामान्य शेतकऱ्याला सरसकट सोयाबीन, कापूस अनुदान व पिक विमा सरसकट भरलेल्या पिक विम्याच्या पावती आधारे अनुदान देण्यात यावे या मागणी चे निवेदन दि.२२ ऑगस्ट रोजी सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ सुरवसे यांनी जिल्हाधिकारी यांना दिवेदन दिले आहे.
निवेदनात असे नमूद केले आहे की,
सध्या महाराष्ट्रात शेतकऱ्याच्या समस्याचा खूप मोठा प्रश्न तयार झालेला असून सर्वसामान्य शेतकऱ्याला शासनाने जाहीर केलेल्या कुठल्याही योजनांचा व कुठल्याही बाबींचा पुरवठा योग्य वेळेवर होत नाही त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्याला प्रत्येक गोष्टीला व अडचणीला सामोरे जावे लागत आहेत तरी शासनाने शेतकऱ्यांच्या अडचणी दूर कराव्यात या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालासमोर आमरण उपोषण उपोषणर्के वैजनाथ सुरवसे ,उमेश जाधव ,नितीन कनकदर जिल्हाधिकाऱ्याला समोर बसले आहेत.