बेपत्ता मुली व महिलांचा तात्काळ तपास करावा व बदलापूर प्रकरण जलदगतीने न्यायालयात चालवावा – मधुकर शेळके
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

बेपत्ता मुली व महिलांचा तात्काळ तपास करावा व बदलापूर प्रकरण जलदगतीने न्यायालयात चालवावा – मधुकर शेळके
तुळजापूर : प्रतिनिधी
राज्यातील एक लाख मुली व महिला बेपत्ता झाले आहेत तात्काळ तपास करण्याबाबत व बदलापूर येथील पिडीतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे याबाबत मा. मुख्यमंत्री यांना शनिवार दि. 24 रोजी आम आदमी पार्टी तुळजापूर च्या वतीने निवेदन पाठविण्यात आले.
राज्यभरात अनेक मुली व महिला बेपत्ता झालेल्या आहेत याबाबत महाराष्ट्र सरकारने बेपत्ता मुली आणि महिलांसाठी राज्य सरकारने कोणत्या उपाययोजना केल्या आहेत. राज्यात वारंवार अश्या घटना मोठ्या प्रमाणात राज्याच्या विविध भागात होत आहेत . सर्वसामान्य नागरिक अश्या घटनामुळे भयभीत झाले असून त्यांच्या मनात असुरक्षीततेची भावना निर्माण झाली आहे . महाराष्ट्र राज्यातील मुली आणि महिला यांच्या सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची गरज असून. तसेच बदलापूर येथील दोन छोट्या मुली वर नराधमाकडून जो अत्याचार झाला आहे त्याबाबत पिंडीतेला न्याय मिळवून देण्यासाठी सदरील प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे व तिच्या कुंटुंबाला शासनाने आर्थिक मदत करून राज्य सरकारने योग्य न्याय द्यावा, याबाबत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी संबंधितांना तात्काळ आदेश द्यावे . अशी मागणी धाराशिव जिल्हा आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा समाजीक कार्यकर्ते मधुकर शेळके यांनी पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे.
पत्रावर आम आदमी पार्टी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर शेळके शहराध्यक्ष किरण यादव व प्रशांत इंगळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत सदरील पत्र माहितीस्तव गृहमंत्री यांना देण्यात आले आहे.