महाराष्ट्र सरकारने नुकताच वर्ग – २ जमीने वर्ग -१, करण्याचा निर्णय घेतलेला लवकरात लवकर अमलात आणावा – मधुकर शेळके
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

महाराष्ट्र सरकारने नुकताच वर्ग – २ जमीने वर्ग -१, करण्याचा निर्णय घेतलेला लवकरात लवकर अमलात आणावा – मधुकर शेळके
तुळजापूर : प्रतिनिधी
राज्यसकारने वर्ग -२ ची जमीन वर्ग -१ करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाची लवकर अंमलबजावणी करण्याबाबत दि.२६ ऑगस्ट रोजी तहसिलदार मार्फतमा .श्री .एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य,मुंबई यांना आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर शेळके यांनी निवेदन दिले आहे
दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की,
महाराष्ट्र सरकारने नुकताच वर्ग – २ जमीने वर्ग -१, करण्याचा निर्णय घेतलेला आहे . त्या अनुषंगाने सदरील निर्णय प्रक्रिया बाबत संबंधीत कार्यवाही लवकरात लवकर करण्यात यावी व सदरील निर्णयाची अमंलबजावणी करण्यात यावी . सरकारने घेतलेला निर्णय या मुळे अनेकांना याचा फायदा होणार आहे सदरील निर्णयाची अमलबजावणी त्वरीत करण्यात यावी याकडे अनेक नागरिकाचे शेतकर्यांचे लक्ष लागून आहे . तरी मी आम आदमी पार्टी धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष या सर्वाच्या वतीने राज्याचे प्रमुख या नात्याने मा .मुख्यमंत्री साहेब आपणास नम्र पुर्वक विनंती करित आहे, तरी आपल्या माध्यमातून सदरील वर्ग – २ जमीने चे वर्ग -१ मध्ये समाविष्ट करण्याच्या निर्णयाची त्वरीत अमलबजावणी बाबत योग्य तो सकारात्मक कार्यवाही होईल अशी आम्ही अपेक्षा करतो कारण,
धाराशिव जिल्हा मध्ये
अनेक शेतकऱ्यांचे शेती जमीन
1 मधुन 2 मध्ये गेल्या आहेत .
गेल्या 40ते50 वर्षे पासुन शेती एक नंबर असता ना गेल्या वर्षी अचानक भोगवाट दोन केल्या मुळे बैंकेत लोण कर्ज मिळत नसल्याने जिल्ह्यातील सर्व शेतकरी अडचणीत आला आहे तरी राज्य सरकार दोन नंबर ची शेती जमीन लवकर च एक नंबर करणार अशी घोषणा केली आहे .
तरी सदरील निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी हि मागणी निवेदना आधारे करित आहोत . आपण त्वरीत अमंलबजावणी करण्यात यावी या निवेदनावर श्री मधुरकर शेळके
जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजीक कार्यकर्ते, किरण माणिक यादव
शहर अध्यक्ष तुळजापूर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.