
लोहारा-प्रतिनिधी
आषाढी एकादशी निमित्त दि.१६ रोजी ठीक ११ ते १ या कालावधीत बाल वारकऱ्यांच्या दिंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. सर्व विद्यार्थी आपल्या घरूनच वेगवेगळ्या साधू संतांच्या वेशामध्ये नटून-थटून आले होते. काही महिला वारकऱ्यांनी तुळशी वृंदावन देखील आणले होते. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह व आनंद होता. ठिक ११ वाजता आदरणीय अभिजीत दादा यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून दिंडीला सुरुवात झाली. दिंडीमध्ये सर्व मुले भजन तसेच पाऊल खेळत खेळत मुख्य रस्त्यावरून प्रबोधिनीच्या मुख्यप्रवेशद्वारा मधून दिंडी शाळेच्या मुख्य प्रांगणात आली. दिंडीत सर्व विद्यार्थ्यांनी सुंदर रित्या भजने गायली व पाऊल भजन देखील खेळले. काही मुलं ध्वज नाचवली.शाळेच्या प्रांगणामध्ये गोल रिंगण घेण्यात आले. तिथेही पाऊल भजन झाले. मुलांनी मनसोक्त पद्धतीने फुगड्या खेळल्या.या दिंडीमध्ये हसरे पक्षी( बालवाडी) च्या मुलांनी उत्कृष्ट पद्धतीने मृदुंगाचे वादन केले. दिंडीमध्ये मुलांचा व शिक्षकांचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावरून ओसडून जात होता. अतिशय भक्तिमय व प्रसन्नमय वातावरणात दिंडीचा कार्यक्रम संपन्न झाला.या दिंडीमध्ये एकूण १०४ बाल वारकऱ्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी ज्ञानप्रबोधिनी केंद्राचे प्रमुख अभिजदा कापरे व मार्गदर्शक श्रुतीताई फाटक तसेच सर्व शिक्षक वृंदांनी उपस्थित राहून सर्व मुलांचा उत्साह वाढवला.