
लोहारा-प्रतिनिधी
हराळी गावाच्या मध्यातून गेलेली धोकादायक वीजवाहक लाईन गावच्या बाहेरुन काढावी आणि तोपर्यंत ही लाईन बंद करावी अशी मागणी लोहारा तालुक्यांतील हराळी येथील ग्रामस्थांनी तहसिलदारांना निवेदनाच्या माध्यमातुन कऱण्यात आली.
हराळी गावातून सुयोग ऊर्जा प्रा. लिमिटेड या कंपनीचे विद्युत पोल व मुख्य लाईन गावाच्या मध्यातून गेली आहे.ही लाईन गावातली बऱ्याच कुटुंबाच्या घरा जवळुन गेली आहे. हनुमान मंदिर जेथे शाळेत जाण्यासाठी लहान मुलं थांबलेली असतात आणि तसेच जुन्या गावातील अंगणवाडीच्या लगत ही लाईन गेलेली आहे.काही दिवसांपूर्वी सचिन सुर्यवंशी यांच्या घराजवळील खांबावर जाळ झाला आणि मोठा आवाज झाला. तो आवाज संपूर्ण गावात ऐकू गेला.काही जणांना शॉक बसल्याचीही जाणीव झाली. खांबाजवळ कावळे ही जळाल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले.त्यामुळे ही लाईन खूपच धोकादायक असल्याने लहान मुलांसह ग्रामस्थांना ही याचा धोखा निर्माण झाला आहे. त्यामुळे ही वीजवाहक लाईन गावाच्या बाहेरुन काढावी अन्यथा पुढील काळात उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाच्या माध्यमातुन तहसीलदार यांना दिला आहे.
आणखीन ही लाईन बंद केलेली नसून याचा धोका निर्माण झाला आहे तरीही प्रशासन आणि सुयोग ऊर्जा प्रा. लिमिटेड कंपनी यांना याकडे लक्ष देणे गरजेचे वाटत नाही. आज ही लाईन बंद नाही केल्यास उद्या तावशी येथील सुयोग कंपनीच्या सबस्टेशनला कुलूप लावण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
——————————––—––————–
काही राजकीय व्यक्तींचे यात हितसंबंध गुंतलेले आहेत त्यामुळे आमच्यावर दबाव टाकला जात आहे. पण आमच्या मुलांच्या व हराळी ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ करु देणार नाही.अशा दबावांना भीक घालत नाही. जो पर्यंत ही लाईन गावच्या बाहेरुन जाणार नाही तो पर्यंत आम्ही शांत बसणार नाहीत. आम्ही संयम दाखवत आहोत याचा अर्थ आम्ही घाबरत आहोत असे अजिबात नाही. प्रशासन यावरती कारवाई करुन सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे.
सचिन सुर्यवंशी
ग्रामस्थ हराळी