
लोहारा-प्रतिनिधी
लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांनी दिनांक 16जुलै रोजी वारकऱ्यांच्या वेशभूषेत आणि माऊली माऊली अशा गजरात दिंडी काढली. याप्रसंगी भारतमाता मंदिर याठिकाणी पालखीचे पूजन जनकल्याणचे श्री शंकर जाधव व प्राचार्य श्री शहाजी जाधव यांच्या हस्ते करण्यात आले, त्यानंतर भारतमाता मंदिर, छ.शिवाजी महाराज चौक, महात्मा फुले चौक,डॉ. बा. आंबेडकर चौक, हिप्परगा रोड, जगदंबा देवी मंदिर, नविन तहसील या मार्गाने शाळेपर्यंत हि दिंडी अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाली. राम,कृष्ण,हरी… माऊली, माऊली अशा जयघोषात लहान चिमुकले वारकऱ्यांच्या वेशभूषेत टाळ मृदंगाच्या गजरात तल्लीन होऊन गेली होती. याप्रसंगी चिमुकल्यांनी पंढरी पंढरी – विठूरायाची पंढरी व धनी मलाही दाखवा ना विठुरायाची पंढरी,भूवरी अवतरी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली,या गीतावर सुंदर असे नृत्य सादर करून सर्व परिसर भक्तिमय केले. या दिंडीमध्ये एक झाड देशासाठी हि संकल्पना राबवून दिंडीत अनेक निसर्गप्रेमी व्यक्तींना रोपटे भेट देवून झाडे लावा झाडे जगवा असा सामाजिक संदेश देण्यात आला.याप्रसंगी स्कुलमधीलमिस सविता जाधव, मिस रेश्मा शेख, मिस चांदबी चाऊस, मिस अर्चना सोनके,मिस नसीमा मुंडे,मिस सरिता पवार, मिस मीरा माने, मिस अनिता मनशेट्टी, मिस स्वाती कोरे, मिस कीर्ती जाधव, मिस सोनाली काटे, मिस शीतल बिराजदार,श्री यशवंत चंदनशिवे, श्री व्यंकटेश पोतदार, श्री सिद्धेश्वर सूरवसे यांच्यासह सर्व शिक्षक कर्मचारी यांनी दिंडीच्या यशस्वीतेसाठी अथक यशपरिश्रम घेतले..