
लोहारा-प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील माकणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दि.१५ जुन रोजी प्रवेशोत्सवानिमित्त प्रवेश दिंडी चे आयोजन करण्यात आले होते.शाळेत नव्याने १ लीच्या वर्गात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक,शिक्षक आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वागत करून ट्रकटर वरून गाजत वाजत मिरवणूक काढण्यात आली.आयोजित पालक मेळाव्याला पालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. यावेळी पाठ पुस्तकाचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले.
आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अँड.दादासाहेब जानकर,उपसरपंच फुलचंद आळंगे,मा. सरपंच विठ्ठल साठे,ग्रा प सदस्य निकेत पत्रिक,सुनिल जाधव,मारुती साठे, विनोद मुसांडे,दादासाहेब मुळे,मुख्याध्यापक विलास नेलवांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पी.टी.कांबळे,जी डी गोरे,सुभाष इंगळे,जे आर विसले,एस एल अंकुरवार यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरीशंकर कलशेट्टी तर आभार शिवाजी साठे यांनी मानले.