
मासुर्डीतील युवकाने घेतला तडवळा शिवारात गळफास
तुळजापूर : प्रतिनिधी
औसा तालुक्यातील मासुर्डी येथील ३८ वर्षीय इसमाने तुळजापूर तालुक्यातील तडवळा शिवारात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली.
औसा तालुक्यातील मासुर्डी येथील गणेश दिनकर यादव (वय ३८) हे घरी भांडन करून पुणे येथे जातो, असे सांगून तीन-चार दिवसांपूर्वी निघाले होते. मात्र, पुण्याकडे न जाता त्यांनी तडवळा शिवारात तुळजापूर-लातूर महामार्गालगत असलेल्या ठाकूर यांच्या शेतातील झाडास साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. तुळजापूर पोलिसांनी पंचनामा केला असता मयताच्या टिशर्टवर वडीलांचा व नातेवाईकांचे मोबाईल नंतर लिहुन ठेवला होता . यावरून पोलिसांनी संपर्क साधून ओळख पटविली. यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले. त्यांच्यावर मासुडी येथे दि.१२ जून रोजी अंतिमसंस्कार करण्यात आले मयत गणेश यादव यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील असा परिवार आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनुरे हे करीत आहेत.