
बेलवाडी येथे प्रवेशोत्सव व शाळा पूर्वतयारी मेळावा
लोहारा-प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलवाडी येथे शाळा प्रवेशोत्सव व शाळा पूर्वतयारी मेळावा घेण्यात आला.
शाळेच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र शासनाचा उपक्रम पहिले पाऊल या निमित्त विद्यार्थ्यांच्या पायाचे ठसे घेण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष यांच्या उपक्रमांमधून विस्ताराधिकारी बालाजी यरमुनवाड यांच्या हस्ते शाळेला पुस्तके देण्यात आली.
यावेळी पुस्तक वाटप आणि शालेय पोषण आहारामध्ये खिचडी व शिरा देण्यात आला.विद्यार्थ्याची गावामधून मिरवणूक काढण्यात आली. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष लहू जाधव यांच्या हस्ते पुस्तक वाटप करण्यात आले.यावेळी सुधीर राठोड,विजय गुळवे,आप्पासाहेब कदम शिक्षक आनंत कानेगावकर,खिजर मोरवे ,निर्मले सुनंदा ,मल्लिकार्जुन कलशेट्टी,परमेश्वर सूर्यवंशी उपस्थित होते.