श्री बसवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय विज्ञान शाखेत आकाश कोरे,महाविद्यालयातुन शिवानी बारुळे प्रथम
Post-गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील जेवळी येथील श्री बसवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या बारावीचा एकूण निकाल हा ९२.८५ टक्के इतका लागला असून यात विज्ञान शाखेचा निकाल हा ९७.५० टक्के, कला शाखेचा निकाल ९१.६०टक्के तर उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाचा निकाल हा ८६.५३ टक्के इतका लागला आहे.
फेब्रुवारी व मार्च २०२४ मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत येथील श्री बसवेश्वर कनिष्ठ महाविद्यालयातून आकाश सुधीर कोरे ८१.०० टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेत प्रथम आला आहे.तर साक्षी दत्तात्रेय मुळे ७९.१७ टक्के व शालिनी ज्ञानेश्वर कारभारी यांनी ७९.१७ टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक तर स्नेहा विवेकानंद मिलगीरे हीने ७८.५० घेत तृतीय क्रमांक पाठवल आहे. कला शाखेतून एकूण ३६ विद्यार्थी बसले होते यापैकी ३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेचा निकाल हा ८८.४६ टक्के इतका लागलाआहे. यात विशेष प्राविण्यास २ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत ११ व द्वितीय श्रेणीत २९ विद्यार्थी पास झाले आहेत.शिवानी दत्तात्रेय बारुळे ८४.५० टक्के गुण मिळवून कला शाखेतून व विद्यालयातून प्रथम आली आहे.शितल मोहन राठोड हिने ७७.६७ गुण मिळवून द्वितीय तर सुप्रिया संजय जाधव हीने ६९.५० गुण घेत तृतीय क्रमांक मिळवला आहे. याबरोबरच या कनिष्ठ महाविद्यालयातून उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाचा (एमसीव्हीसी) निकाल हा ८६.५३ टक्के लागला असून यावेळी बसलेले ५२ विद्यार्थ्यांपैकी ४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम श्रेणीत १४ व द्वितीय श्रेणीत ३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात महादेव संजय हराळे यांनी ७१.६७ टक्के गुण घेत प्रथम तर हनुमंत राजेंद्र बादिगोळ यांनी ६७.३३ टक्के घेत द्वितीय तर विशाल संतोष गाडेकर ६६.३६ टक्के गुण घेत तृतीय क्रमांक मिळवला आहे.
परीक्षेला एकूण १६८ विद्यार्थी बसले होते. यापैकी १५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावेळी या कनिष्ठ महाविद्यालयाच्या बारावीचा एकूण निकाल हा ९२.८५ टक्के इतका लागला आहे. यात विज्ञान शाखेचा निकाल हा ९७.५० टक्के लागला असून विज्ञान शाखेत परिक्षेला एकूण ८० विद्यार्थ्याथी बसले होते. या पैकी ७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष प्राविण्यासह ७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले प्रथम श्रेणीत ५९ व द्वितीय श्रेणीत १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे पदाधिकारी, संचालक, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य उपप्राचार्य व शिक्षकाने अभिनंदन केले आहे.