आ.ज्ञानराज चौगुले यांची लोहारा येथील नईमोद्दिन रहमु सवार यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यास उपस्थिती
Post-गणेश खबोले

लोहारा/प्रतिनिधी
लोहारा शहरातील नईमोद्दिन रहमु सवार यांच्या मुलीचा विवाह सोहळा रुईभर येथील हसन मैनुद्दीन मुलानी यांचा मुलगा गौसपाक यांच्याशी मोठ्या थाटात संपन्न झाला. या विवाह सोहळ्यास उमरगा लोहारा तालुक्याचे लोकप्रिय आ. ज्ञानराज चौगुले यांनी उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना उमरगा तालुका प्रमुख बळीराम सुरवसे, शिवसेना लोहारा तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, माजी गटनेते अभिमान खराडे, शिवसेना नेते राजेंद्र माळी, नगरसेवक अविनाश माळी,उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, कृ.उ. बाजार समिती माजी सभापती दयानंद गिरी, शब्बीर गवंडी, रोहयोचे माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, नगरसेवक अमिन सुंबेकर, माजी नगरसेवक श्रीनिवास माळी, नगरसेवक जालिंदर कोकणे, शिवसेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, पं.स. माजी सदस्य दिपक रोडगे, ओम कोरे, महमद फकिर, बापु गाडगे, योगेश मिटकरी, अमोल माळी, नजीर शेख, सिकंदर गंजीवाले, शमशोद्दीन भोंगळे, वहाब हेड्डे, अदि उपस्थित होते.