डॉ सत्तेश्वर मानव विकास केंद्र व मायेच्या माणसाचे मंगलधाम केंद्राचे उदघाटन !
Post-गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
महात्मा बसवेश्वर जयंती दिनाचे औचित्य साधून लोहारा तालुक्यातील जेवळी या गावांमध्ये डॉक्टर सत्येश्वर पाटील मानव विकास केंद्र व मायेच्या माणसाचे मंगलधाम केंद्राचे उद्घाटन फित कापून करण्यात आले.
या प्रसंगी डॉ सत्तेश्वर मानव विकास केंद्राच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या केंद्रात मायेच्या माणसाचे मंगलधामचें देखील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित उद्घाटन करण्यात आले.
या सामाजिक प्रतिष्ठान च्या माध्यमातून मायेच्या माणसाचे मंगलधाम या ठिकाणी सुरू करण्यात आले असून या केंद्रात परिसरातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून शिबीर चालवणे, शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी मार्गदर्शन शिबीर माती परीक्षण कार्यक्रम घेणे अनाथ गरजवंत विद्यार्थ्यांना राहण्याची सोय तसेच वेळोवेळी शैक्षणिक मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे साहित्यिक निवृत्त शिक्षणाधिकारी बाबुराव माळी यांनी उदघाटन प्रसंगी सांगितले.
या प्रसंगी रामराव काळे,अभियंता प्रसाद पाटील,सौ अनिता माळी, अनिल माळी,दयानंद मडोळे,निवृत्ती माळी, राजेंद्र माळी, सह पत्रकार अब्बास शेख आदी मान्यवर उपस्थित होते.