खरीप हंगाम पूर्व सोयाबीन पिक लागवड,खत व्यवस्थापन,पीक संरक्षण,बीबीएफ द्वारे पेरणी,गोगलगाय नियंत्रण,सोयाबीन उगम क्षमता प्रशिक्षण
Post-गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
लोहारा तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील प्रत्येक गावात खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण मार्गदर्शन बैठक घेण्यात येत आहेत.
तालुक्यातील लोहारा (खुर्द) आणि मुर्शदपूर येथे दि.१४ मे.रोजी खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत सोयाबीन पिकाची लागवड,खत व्यवस्थापन, पीक संरक्षण,बीबीएफ द्वारे पेरणी,गोगलगाय नियंत्रण,सोयाबीन उगम क्षमता चाचणी डेमो शेतकऱ्यांना दाखवण्यात आला.तसेच महाडीबीटी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या योजना विषयी माहिती देण्यात आली.यावेळी बीबीएफ पेरणी यंत्र धारक शेतकरी तसेच ट्रॅक्टर चालक व मालक यांचे प्रशिक्षण घेण्यात आले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी महेश देवकाते यांनी बीज प्रक्रिया,हुमनी कीड नियंत्रण व खरिप हंगामातील प्रमुख पिकाविषयी मार्गदर्शन केले तर कृषी अधिकारी दत्तात्रय पाटील यांनी वाळवी कीड नियंत्रण विषयी मार्गदर्शन केले.मंडळ कृषी अधिकारी शिवाजी ताराळकर,कृषी पर्यवेक्षक एम एम माळकुंजे यांनी बी बी एफ पेरणी ,बियाणे उगवांशक्ती तपासणी, हुमणी कीड नियंत्रण, विषयक मार्गदर्शन केले.कृषी सहाय्यक एन बी पाटील यांनी बीबीएफ पेरणी यंत्र द्वारे पेरणी करण्याचे फायदे त्याचप्रमाणे बीबीएफ पेरणी यंत्राद्वारे पेरणी करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी तसेच बीबीएफ पेरणी यंत्र जोडणी याविषयी मार्गदर्शन केले.
या वेळी कृषी विभागाच्या वतीने उपस्थित शेतकऱ्यांना मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे,महाडीबीटी मध्ये ऑनलाईन अर्ज करणे,एम.आर.जी एस.अंतर्गत फळबाग लागवड अर्ज सादर करणे,गोगलगायी चे एकात्मिक आणि सामूहिक नियंत्रण या विषयी सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी कृषी सहाय्यक श्री के.सी. गायकवाड,कृषी पर्यवेक्षक एम.एम.फावडे,सरपंच सचिन रसाळ,पोलीस पाटील बिरदेव सूर्यवंशी,ग्रामपंचायत सदस्य सचिन रसाळ,सदस्य हनुमंत सूर्यवंशी,गणेश पाटील,द्राक्ष बागायतदार नितीन रसाळ,अरुण रसाळ,बालाजी रसाळ,खंडू रसाळ,संजय मूटे,विकास पाटील, बळीराम रसाळ, अजय रसाळ, योगेश पाटील, संजय कारभारी अर्जुन रसाळ, हनुमंत रसाळ,हनुमंत सूर्यवंशी, दत्ता गाढवे,वैष्णव लोखंडे,संजय मूरते,लक्ष्मीबाई रसाळ,केसरबाई कांबळे, रोहन विशाल जमादार उपस्थित होते.