सास्तुर येथे खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण,महाडीबीटी अंतर्गत विविध योजनांची माहिती
Post-गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण बैठक व प्रशिक्षण दि.१३ रोजी घेण्यात आले.तालुका कृषी अधिकारी महेश देवकते व मंडळ कृषी अधिकारी शिवाजी तराळकर यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यक्रम पार पडला.कृषी सहाय्यक दिपक जाधव यांनी शेतकरी बांधवांना सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासणी,बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.यावेळी बी बी एफ द्वारे पेरणी तसेच टोकन पद्धतीने लागवड जमिनीच्या प्रकारानुसार खरीप वाणाची निवड गोगलगायचे नियंत्रण मग्रा रोहयो अंतर्गत फळबाग लागवड महाडीबीटी अंतर्गत विविध योजनांची माहिती देण्यात आली.
यावेळी सरपंच शितलताई पाटील,माजी उपसरपंच राजवर्धन पाटील,कृषी पर्यवेक्षक एम एम फावडे,गोविंद यादव,विठ्ठल माळी,रोहित पूर्ण,अमित औसेकर,नाना पवार,शुभम देशमुख,किसन सरवदे,सोनाजी हसुरे,दादा माने,शांतेश्वर स्वामी, शिवाजी भुरे,कुमार चौरे आदी उपस्थित होते.यावेळी सर्व योजनांची माहिती कृषी सहाय्यक दिपक जाधव यांनी शेतकऱ्यांना दिली.