ब्रेकिंग
महायुतीच्या उमेदवार सौ.अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ नगरसेविका कमल भरारे यांची प्रभागात घर टू घर प्रचार फेरी
Post-गणेश खबोले

लोहारा/प्रतिनिधी
देशाला महासत्ता बनविण्यासाठी नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघातील शिवसेना – भारतीय जनता पार्टी – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – रिपाई – रासप महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ.अर्चनाताई राणाजगजीतसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ लोहारा शहरातील नगरसेविका श्रीमती कमल राम भरारे यांनी प्रभाग क्रमांक 7 मध्ये घर टू घर प्रचार फेरी काढुन पत्रके वाटप केली.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे,भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला,तालुका सरचिटणीस दगडु तिगाडे,प्रशांत लांंडगे,संजय मिटकरी,गुरुनाथ बंगले,काशीनाथ कमलामुरे, यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
