
लोहारा-प्रतिनिधी
“हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू” असे ब्रीद वाक्य असलेल्या लोहारा येथील हायस्कूल लोहारा शाळेत सेवानिवृत्त मुख्याध्यापक आणि शिक्षक या दोघांनी शाळेला भेट देत महाराष्ट्र दिन साजरा केला.
१ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून हायस्कूल लोहारा मध्ये ३४ वर्ष सेवा करून सेवानिवृत्त मुख्याध्यापक वसंत भीमा राठोड यांनी प्रशालेला ६५ हजार रुपये खर्च करून ५० सायकलीसाठी सायकल स्टॅन्ड तयार करून शाळेला भेट दिले. विद्यार्थ्यांचा आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा सायकल चालवण्याकडे कल वाढावा व प्रदूषण मुक्तते कडे वाटचाल व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सेवानिवृत्त मुख्याध्यापक वसंत भीमा राठोड यांनी हा उपक्रम राबविले.सेवेत असताना सर्वच शिक्षक शाळेसाठी झटत असतात पण निवृत्तीनंतरही त्या शाळेची प्रगती झाली पाहिजे हे ध्येय ठेवून त्यांनी शाळांपयोगी सायकल स्टॅन्ड प्रशालेला भेट दिले.
तसेच हायस्कूल लोहारा प्रशालेचे सध्याचे शिक्षक सतीश जट्टे यांनी त्यांचे वडील कै.तमन्नप्पा महादेवआप्पा जट्टे यांच्या स्मरणार्थ प्रशालेची गरज ओळखून ५१ हजार रुपये किमतीचे संगणक,प्रिंटर संच व त्यासाठीचे आवश्यक फर्निचर शाळेस भेट दिले.शाळा तंत्रज्ञानाच्या प्रवाहात असावी तरच मुले तंत्रस्नेही होतील हा उद्देश सतीश जट्टे यानी ठेऊन संगणक,प्रिंटर संच भेट दिले.मा.सरपंच शंकर आण्णा जट्टे यांच्या शुभहस्ते संगणक संच शाळेस भेट देण्याचा कार्यक्रम पार पाडला. यावेळी मुख्याध्यापक डी एम पोद्दार,सेवानिवृत्त शिक्षक आर के पोद्दार,श्याम पोद्दार,माणिक तिगाडे,वैजनाथ होळकुंदे,सौ नंदा वसंत राठोड,विठ्ठल वचने पाटील,वैजिनाथ पाटील,दिलीप शिंदे,पी यु पाटील,श्रीम एन जी कोळी,श्रीम साबणे मॅडम,जी एस पायाळ,व्ही.एस.नागणे,यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.