धनेगाव ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार ! १९९३ पासुन ग्रामस्थांची बेदखल? ३५०मतदार
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

धनेगाव ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार !
१९९३ पासुन ग्रामस्थांची बेदखल?
३५०मतदार
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तालुक्यातील धनेगांव हे १९९३च्या भुकंपात उध्दवस्त झाले असुन अजुन ही या गावचे पुर्नवसन न केल्याने धनेगाव भुकंपग्रस्त ग्रामस्थांनी आगामी लोकसभेच्या लोकशाहीच्या उत्सवावर मतदान न करुन बहिष्कार घालण्याचे निवेदन जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना दिले आहे.
मंगळवार जिल्हयात पंतप्रधान नरेंद्रमोदी येत असल्याने निवडणुक बहिष्कार बाबतीत प्रशाषणात व राजकिय पातळीवर काय हालचाली होणार मोदी न्याय देणार का याची उत्सुकता सर्वाना लागली आहे
निवेदनात म्हटले आहे की, १९९३ साली किल्लारी येथे झालेल्या भुकंपामुळे मौजे धनेगांव
येथील घरांची मोठ्या प्रमाणात नासधुस होऊन संपुर्ण गाव बेचीराख झाले होते. या कारणामुळे गावातील लोक मौजे धनेगांव येथील प्रतिष्ठीत नागरीक मा. प्रकाश गुणवंतराव देशमुख यांच्या मालकीच्या गट नं. 30
क्षेत्र 02 हे. 60 आर या क्षेत्रावर येऊन वास्तव्य राहीले. गावातील प्रतिष्ठीत नागरीकांच्या संमतीने व
गावातील लोकांच्या मागणीमुळे संपुर्ण गाव हे गट नं. 30 मध्ये वसले. त्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालय,
अंगणवाडी, सभागृह, पाणी पुरवठा योजना, सिमेंट रस्ते, इंदिरा आवास योजने अंतर्गत दलीत व इतर
समाजातील लोक घरे बांधुन शासकीय योजनेचा लाभ घेतलेला आहे. परंतु धनेगांवचे पुनर्वसन न
झाल्यामुळे सद्यस्थितीत 7/12 उताऱ्यावर गट नं. 30 ही जमीन प्रकाशराव गुणवंतराव देशमुख यांच्या
मालकीचीच असल्यामुळे आमची घरे ही आमच्या नावे झालेली नाहीत. किल्लारी भुकंप होऊन 30 वर्षे
होऊन गेली आहेत तरीही आजपर्यंत गावाचे कायदेशीर व प्रशासकीय पुनर्वसन झालेले नाही.
सन १९९० पर्यंत कुंभारी धनेगांव ही ग्रुप ग्रामपंचायत होती. त्यानंतर धनेगांव ही स्वतंत्र
ग्रामपंचायत उदयास आली.
आजपर्यंत ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध करून गावाने वेगळाच आदर्श निर्माण केला
आहे. तसेच ४ मे २०७ रोजी तत्कालीन महामहिम
अब्दुल कलाम यांच्या व्दारे
निर्मल ग्राम पुरस्कारही प्रदान करण्यात आला. धनेगाव ग्रामपंचायत ही आदर्श ग्रामपंचायत म्हणुन
ओळखली जाते. आमच्या गावाचे प्रशासकीय पुनर्वसन व्हावे म्हणुन सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घातला होता. तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत याही
निवडणुकांवर आज पर्यंत बहिष्कारच आहे.
या प्रश्नावर आम्ही ग्रामस्थांनी तत्कालीन महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष व जेष्ठ नेता हरीभाऊ
बागडै यांना भेटुन आमच्या मागण्या मांडल्या. त्याला अनुसरून मा. बागडे साहेबांनी शासन स्तरावर
पाठपुरावा करून या विषयाला चालना देण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात संबंधीत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सदरील विषयामध्ये लक्ष घालुन तात्काळ आवश्यक कार्यवाही करणे बाबत संबंधीत अधिकाऱ्यांना
निर्देश दिले होते. त्यानंतर उपजिल्हाधिकारी साहेब, धाराशिव यांनी मौ.धनेगांव येथील जमीनीची मोजणी
करून शाळा, अंगणवाडी, रस्ता, नाली, प्लॉट वाईज घरे, सभागृह, मंदिर, इ. असलेल्या क्षेत्राची मोजणी
करून प्रत्येक मालमत्तेचे क्षेत्रफळ काढुन पाहिले असता ते क्षेत्र ०२ हे. ६० आर असल्याचे कळले.
मा.जिल्हाधिकारी यांच्या कडुन, विभागीय आयुक्त यांच्या मार्फत मा. अप्पर मुख्य सचिव महसुल
व वनविभाग (मदत व पुनर्वसन) मंत्रालय, मुंबई यांच्याकडे शासन स्तरावर पुनर्वसना बाबत सन २०१८
रोजी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. परंतु २०२१ मध्ये मंत्रालय स्तरावरून भुकंप पुनर्वसन व विस्तार
वाढ’ या योजनेमध्ये धनेगांवचे पुनर्वसन करता येत नसल्याबाबत मा. जिल्हाधिकारी यांना कळविण्यात
आले व जिल्हाधिकारी स्तरावर या बाबत योग्य तो निर्णय घ्यावा असे पत्रात नमुद करण्यात आले आहे.
परंतु या नंतर 3 वर्ष झाले तरी आपल्या स्तरावरून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही म्हणुन
ग्रामस्थांनी मिटींग घेऊन लोकसभा निवडणुक २०२४ वर बहीष्कार कायम ठेवण्याचे एकमताने ठरवले
आहे.
यानिवेदनावर माजी अनिल काशिनाथ चुनाडे
शिवाजी दादाराव सुरवसे
अकुंश नारायण सुरवसे अर्जुन ज्ञानोबा सुरवसे आर्जुन मारुती पारधे या पाच माजी सरपंचासह भुकंपग्रस्त ग्रामस्थांच्या स्वाक्षरी आहेत.