
पंतप्रधान मोदींची सभा
भाविकांच्या मुळावर !
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा मंगळवार दि ३०रोजी तुळजापूर – उस्मानाबाद रोडवर रा काँ उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारासाठी
आयोजीत केली होती.
पंतप्रधान नरेंद्रमोदी यांच्या सुरक्षेसाठी सकाळी दहा ते दुपारी चार या सहा कालावधीत तुळजापूर उस्मानाबाद मार्गावर
वाहतूक मार्गात बदल,केल्याने मंगळवारी देवीदर्शनार्थ खाजगी वाहनांना आलेल्या भाविकांना गैर सोयीस सामोरे जावे लागले
, मा. श्री नरेंद्र मोदी पंतप्रधान, यांची सभा धाराशिव एमईसीबी विश्राम गृह, नँशनलहायवे ५२धुळे – सोलापूर महामार्ग चे समोर आयोजीत केली होतीया पार्श्वभूमीवर नँशनलहायवे ५२ वरुन धाराशिव ते मौजे वडगाव सि. मार्गे तुळजापूर कडे जाणारी वाहतुक बेंबळी टी पॉईंट – रुईभर- बेंबळी- केशेगाव मार्गे- तुळजापूर कडे पथक्रमण करतील.नँशनलहायवे ५२ वरुन तुळजापूर ते मौजे वडगाव सि. मार्गे धाराशिव कडे येणारी वाहतुक धाराशिव रोड बायपास ब्रीज तुळजापूर- केशेगाव- बेंबळी- रुईभर- बेंबळी टी पॉईट मार्गे धाराशिव कडे पथक्रमण करतील.किंवा धाराशिव रोड बायपास ब्रीज तुळजापूर- अपसिंगा- पोहणेर- गावसुद मार्गे- तुळजापूर नाका टी पॉईट मार्गे धाराशिव कडे पथक्रमण करतील.
सभा तुळजापूर उस्मानाबाद रोडवर असल्याने या मार्गावरुन येणारी जाणारी वाहने व
इतर सर्व प्रकारांच्या वाहनास ३० एप्रिल रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते ४
वाजेपर्यंत प्रतिबंध घातल्यामुळे देवीदर्शनार्थ खाजगी वाहनांनी आलेल्या भाविकांची गैरसोयीस सामोरे जावे लागले याकाळात , मुंबई पुणे नाशीक सह अनेक लांबच्या गावांतील वाहना चालकांना उस्मानाबाद तुळजापूर ला कुठल्या पर्यायी मार्गाने जायचे ते माहीत नसल्यामुळे आपसिंगा केशगाव बेंबळी मार्गावरभाविकांची वाहने रस्ता शोधत असल्याचे दिसुन आले यामुळे भाविकांचा वेळ वाया जावुन इंधन खर्च वाढला .