
लोहारा-प्रतिनिधी
लोहारा येथे दि.23 रोजी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली.लोकशाही वाचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या मागे ताकद उभी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे जिल्हा सरचिटणीस रौफ बागवान,सेवादल तालुकाध्यक्ष श्यामसुंदर तोरकडे यांच्या पुढाकारातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक घेण्यात आली.
काँग्रेस पक्ष प्रदेश कार्याध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तरी काँग्रेसची विचारधारा जोपसणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी बैठकीत एकनिष्ठ राहात पक्ष वाढविण्याचा संकल्प केला.
लोहारा तालुक्यात काँग्रेस पक्षाची स्थिती नाजूक झाली असली तरी काँग्रेस विचारसरणी मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे.यावर्षात लोहारा काँग्रेस तालुका अध्यक्षा सह काही कार्यकर्ते,लोहारा येथील काँग्रेस पदाधिकारी यांनी काँग्रेस ला सोडचिठ्ठी देत काही बसवराज पाटील तर काही परत स्वगृही परतले.परंतु आज झालेल्या काँग्रेस बैठकीतुन काँग्रेस पक्षाला अजुन नवी उभारी मिळेल असे दिसून आले.
यावेळी जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष विलास शाळू,राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नेते नागण्णा वकील,उमरगा तालुकाध्यक्ष अॅड.विलास राजोळे,माजी सरपंच शंकर जट्टे,माजी तालुकाध्यक्ष बाबासाहेब जाधव,होळी ग्रामपंचायत सदस्य केशव सरवदे,अॅड. संगमेश्वर माशाळकर,विठ्ठल पाटील,ओम पाटील,सोशल मीडिया चे प्रकाश होंडराव,सुनील वाले,माणिक चिकटे,शरणप्पा शेगजी,शिवा स्वामी,वीर फावडे,विकास सोसायटी मा.चेअरमन रफीक शेख,संजय मिटकरी,महेश देशमुख,नागनाथ पत्रिके,दिलीप पाटील,इस्माईल मुल्ला,चंद्रकात साखरे,बसवराज वकील,प्रकाश चव्हाण,सुरमा पाटील,प्रभाकर बिराजदार,सचिन माळी,केशव पाटीलभगवान मक्तेदार,मल्लिनाथ बनशेट्टी,नजीर सिद्दकी,सुक्षेण टेलर,योगेश मिटकरी,छोटू विरोधे,हुसेन शेख,अप्पू स्वामी संगाप्पा मुके,रज्जाक खडीवाले,सिराज सिद्दकी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.