दुर्दैवी! तुळजापूर तालुक्यात वीज पडून दुधाच्या दोन म्हशी आणि एक गाय ठार
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

दुर्दैवी! तुळजापूर तालुक्यात वीज पडून दुधाच्या दोन म्हशी आणि एक गाय ठार
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर शहरासह तालुक्यात शनिवारी (ता.२०) दुपारनंतर झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसात वीज कोसळून तीन जनावरे दगावली आहेत. मानेवाडी येथील शेतकरी सुधाकर अंबाजी माने यांची एक याय तर चिवरी येथील शेतकरी महादेव वसंत मोहिते यांची एका म्हेश आणि कारर्ला येथील शेतकरी मारुती सुर्यवंशी यांची दुधाची म्हैश विज कोसळल्याने मृत्यू झाला आहे.
याबाबत महसूल प्रशासनाकडून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, शनिवारी दुपारच्या नंतर अचानक तुळजापूर तालुक्यात ढगाळ वातावरण तयार झाले. वादळी वारे वाहू लागले. त्यातच बेमोसमी पावसाला सुरुवात झाली. या पावसाने शेकऱ्यांचे द्राक्षे, आंबा फळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.
तुळजापूर यथे अवकाळी पाऊसात गेल्या दोन दिवसांपासून तुळजापूर परिसरात ढगाळ वातावरण निर्माण होत होते. शनिवारी दि.२० एप्रिल रोजी दुपार नंतर वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने शेतकरी धास्तावला आहे. महसूल प्रशासनाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे..
तुळजापूर तालुक्यातील कारला येथील शेतकरी केवळ सलबा देवकर यांची म्हैस तर गोरोबा तुळशीराम देवकर यांची एक शेळी झालेल्या वादळीवारे व पावसाने वीज पडून ठार झाल्या आहेत