महायुतीच्या उमेदवार सौ.अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्राचारार्थ हिप्परगा (रवा), उंडरगाव, नागराळ (लो) येथे कार्नर बैठक संपन्न

लोहारा/प्रतिनिधी
उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सौ.अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा), उंडरगाव, नागराळ (लो) येथे कार्नर बैठक दि.23 एप्रिल रोजी संपन्न झाली. या तिन्ही गावातील बैठकिस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हिप्परगा (रवा) येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कार्नर बैठक घेण्यात आली. उंडरगाव येथील हनुमान मंदिरात बैठक घेण्यात आली. यावेळी हनुमान जयंतीचे औचित्य साधुन हनुमान मंदिरात दर्शन घेण्यात आले. नागराळ (लो) येथील दत्त मंदिरात कार्नर बैठक घेण्यात आली. यावेळी भाजपा लोहारा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, तालुका सरचिटणीस दगडु तिगाडे, तालुका उपाध्यक्ष संपत देवकर, उपसरपंच विजय लोमटे, भाजपा तालुका विधी आघाडी अध्यक्ष ॲड.देविदास जाधव, अनिल अतनुरे, बबनगिरी महाराज, अदिंनी मार्गदर्शन करताना म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने आपल्याला एक खंबीर नेतृत्व मिळाले आहे. देशाला जेंव्हा नेतृत्व खंबीर मिळते तेव्हा देश सुरक्षित असतो. या नेतृत्वामुळे जगात देशाची प्रतिष्ठा वाढली आहे. उद्योग, शिक्षण, आरोग्य किंवा देशाला सुरक्षा देण्याचा विषय असेल यामध्ये आपण अग्रेसर आहोत म्हणून मोदींजीना मदत म्हणजेच राष्ट्रीय एकात्मतेला मदत त्यामुळे त्यांचे हात आपण बळकट केले पाहिजे. या कणखर नेतृत्वासाठी व देश हितासाठीच आपण सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने काम करुन महायुतीच्या उमेदवार सौ.अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठिमागे खंबीरपणे उभे रहावे, असे सांगीतले. व तसेच लोहारा उमरगा तालुक्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार यांच्या कडे आ.ज्ञानराज चौगुले यांनी पाठपुरावा करुण लोहारा उमरगा तालुक्यात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुण विकास कामे मोठ्या प्रमाणात केली आहेत. भाजपाचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी देखील तेरणा टृस्ट च्या माध्यमातून विविध आजारावर मोफत उपचार केला आहे. महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांनी जि.प. च्या उपाध्यक्ष असताना आपल्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी देऊन विकास केला आहे. तरी आपण सर्वजण मिळुन एक दिलाने आपण त्यांना साथ देऊ असे यावेळी सांगितले. यावेळी सरपंच अभिमान कांबळे (हिप्परगा रवा), ग्रामपंचायत सदस्य नारायण क्षीरसागर, ज्ञानदेव मोरे, मधुकर जाधव सर, मोहन होनाळकर, बालाजी नरगाळे, परमेस्वर गिराम, रामहरी मोरे, विनायक नरगाळे, बाळासाहेब जाधव, बालाजी मोरे, नानासाहेब जाधव, इंद्रजित मुळे, तुकाराम मुळे, नाना जाधव, बालाजी नरगाळे हिप्परगा (रवा), अक्षय रवळे, शिवाजी सुर्यवंशी, रघुनाथ भुसारे, राजेंद्र पवार, संजय सुर्यवंशी, दौलत सुर्यवंशी, संजय माने, हरिदास पवार, गणेश सुर्यवंशी, प्रविण ढोबळे, कुंडलीक सुर्यवंशी, दशरथ जाधव, नागनाथ घोडके (उंडरगाव),
सत्यनारायण गोरे, रविकांत चिंचोळे, बाबुराव घाडगे, ज्ञानेश्वर गोरे, अक्षय गोरे, किरण चिंचोळे, कोडिंबा काकडे, ऋषिकेत गोरे, निळकंठ गोरे, बालाजी भरगांडे, मौला पठाण, राजेंद्र गोरे, वाल्मिक कोळी, गुंडु जाधव, दिगंबर गोरे, दगडु भोकरे, नागनाथ गोरे, अवधुत गोरे, नारायण गोरे, आकाश गोरे, विष्णु गोरे, भरत माटे नागराळ (लो) यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.