
लोहारा-प्रतिनिधी
राष्ट्रीय जंगम संघटना धाराशिव जिल्हा यांची बैठक लोहरा येथील बसवेश्वर मंदिरात पार पडली.या बैठकीत लोहारा तालुका समन्वयक म्हणून दत्तात्रय स्वामी यांची तर राष्ट्रीय जंगम संघटना धाराशिव जिल्हा युवा समन्वयक म्हणून अनिकेत स्वामी यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस आद्य जगद्गुरु श्री रेणुकाचार्य यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून या बैठकीची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाची प्रस्तावना शिक्षण विस्तार अधिकारी दत्तप्रसाद जंगम यांनी विस्तृतपणे केली .या बैठकीत उमरगा तालुका समन्वयक प्रवीण स्वामी,विरुपक्ष स्वामी यांच्यासह मान्यवरांचे विषय अनुषंगाने मार्गदर्शन झाले.धाराशिव जिल्हा समन्वयक त्रिंबक कपाळे यांनी तालुका समन्वयक व जिल्हा युवा समन्वयक निवड करण्याबाबत ठराव मांडला.या बैठकीतून सुचित झालेले तालुका समन्वयक दत्तात्रेय स्वामी व धाराशिव जिल्हा युवा समन्वयक म्हणून अनिकेत स्वामी यांची निवड झाल्याचे श्री कपाळे यांनी घोषित केले.सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थापत्य अभियांता सहाय्यक पदावर निवड झालेले शंभुलिंग स्वामी यांचं विशेष गुणगौरव करण्यात आला.
या बैठकीस धाराशिव येथून प्रवीण स्वामी,शैलेश कपाळे, येणेगुर येथील शेखरप्पा स्वामी,महेश स्वामी, जेवळी येथील विरुपक्ष स्वामी,लोहारा येथील मल्लिनाथ स्वामी,दयानंद स्वामी,आमरेश्वर स्वामी,विवेकानंद स्वामी,चिदानंद स्वामी,विरेश स्वामी,शरनाय्या स्वामी,बबन (निळकंठ )स्वामी,अप्पू स्वामी, शंभोलिंग स्वामी, दत्तात्रय स्वामी, शिवा स्वामी,संजय स्वामी, योगेश हिरेमठ,ओंकार स्वामी, शांतेश्वर स्वामी, श्रीनिवास स्वामी, शंतकुमार स्वामी, विरपक्ष स्वामी, शेखर स्वामी, महेश स्वामी, संजय स्वामी, आदी. समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.