लोहारा शहरात विविध कार्यक्रमाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
Post-गणेश खबोले

लोहारा/प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती लोहारा शहरात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. सकाळी सहा वाजता मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. तसेच वादविवाद स्पर्धा झाली. सकाळी साडेनऊ वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. नगरसेवक अमीन सुंबेकर यांच्या हस्ते डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बुध्द वंदना, त्रिशरण, पंचशील घेण्यात आले. त्यानंतर नगराध्यक्षा वैशाली खराडे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी डॉ.हेमंत श्रीगिरे, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, नगरसेवक तथा जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, ठाकरे गट शिवसेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, माजी गटनेते अभिमान खराडे, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, नगरसेवक प्रशांत काळे, रोहयोचे माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, शब्बीर गवंडी, पं.
स.माजी सदस्य दिपक रोडगे, शहर प्रमुख श्रीकांत भरारे, अयनोद्दीन सवार, नगरसेवक दीपक मुळे, शहर प्रमुख सलीम शेख, महेबूब गवंडी, हरी लोखंडे, रौफ बागवान, नाना पाटील, शालेय व्यवस्थापन समिती सभापती के.डी. पाटील, ज्येष्ठ पत्रकार निळकंठ कांबळे, बालाजी बिराजदार, गिरीश भगत, तानाजी माटे, आब्बास शेख, भाजपा माजी जि.चिटणीस विक्रांत संगशेट्टी, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, तालुका सरचिटणीस दगडु तिगाडे, इस्माईल मुल्ला, माजी नगरसेवक श्याम नारायणकर, सतिश गिरी, विकास घोडके, रघुवीर घोडके, प्रभाकर बिराजदार, भागवत गायकवाड, प्राचार्य शहाजी जाधव, श्रीकांत कांबळे, बसवराज पाटील, आरपीआय तालुकाध्यक्ष दिगंबर कांबळे, महादेव कांबळे, बाळु शिंदे, सुशिल कांबळे, बाळु कांबळे, तात्या कांबळे, राजपाल वाघमारे, कल्याण कांबळे, लक्ष्मण रोडगे, विशाल कोकणे, जनक कोकणे, मारूती रोडगे, उज्ज्वला गाटे, सुनिता कांबळे, सुमन वाघमारे, नंदा कांबळे, अनुसया शिंदे, जयश्री कांबळे, रूपाली वाघमारे, सुवर्णा कांबळे, अश्विनी वाघमारे, रूपाली माटे, सुरेखा कांबळे, त्रिशला माटे, अनुसया कांबळे, सोनाली गायकवाड यांच्यासह जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.