
तुळजापूर-प्रतिनिधी
केंद्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्ड, नवी दिल्ली (CBSE) यांच्यामार्फत शैक्षणिक सत्र २०२२-२३ मध्ये दहावी ,बारावी या वर्गाच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये नवोदय विद्यालयातील दहावी व बारावीचा निकाल वर्गाचा १०० टक्के लागला होता. यामध्ये मराठी विषयांमध्ये १०० पैकी १०० गुण ३१ विद्यार्थ्यांना व सरासरी गुण प्रत्येक विद्यार्थ्याला ९८.६१ होते. तर सामाजिक विज्ञानामध्ये १०० पैकी १०० गुण १ विद्यार्थी वर्गाचे सरासरी गुण ९१% तर, संगणक विषयांमध्ये १०० पैकी १०० गुण २ विद्यार्थी विषयाचा सरासरी गुण ९१ असे गुण प्राप्त झाले होते .यासाठी मराठी विषयाचे अध्यापन श्रीमती विद्या जाधव, सामाजिक विज्ञान अध्यापन श्री चक्रपाणि गोमारे, संगणक विषयाचे अध्यापन यश पाटील या तज्ञ शिक्षकांनी केल्यामुळे विद्यालयाच्या नावलौकिक वाढविल्याबद्दल नवोदय विद्यालय समिती नवी दिल्ली व संभाग पुणे यांच्यातर्फे प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केल्याबद्दल सन्मान व अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री गंगाराम सिंह म्हणाले शिक्षकांनी उत्कृष्ट मार्गदर्शन व प्रामाणिकपणे केलेल्या कार्याची ही पावती असून यापुढेही विद्यालयाच्या उन्नतीसाठी व विद्यार्थ्यांच्या हितासाठी अशाच प्रकारचे कार्य करून नवोदय विद्यालय तुळजापूरचे नाव देशांमध्ये चमकवण्याचे आवाहन या तज्ञ शिक्षकांना प्राचार्य गंगाराम सिंह यांनी केले. यावेळी विद्यालयातील उप प्राचार्य श्री एस एच गायकवाड, वरिष्ठ अध्यापक सचिन खोब्रागडे,श्री हरी जाधव सर्व विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक वृंद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता कराड मॅडम यांनी केले.