न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थीनी बनवला 1350 जोडशब्दचा ” माझा शब्दसंग्रह “.
पत्रकार-गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
लोहारा शहरातील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलच्या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थीनी अभ्यासक्रमातील मराठी विषयाच्या पाठयक्रमातून स्वतः सर्व गदय, पदय विभागाचे मुकवाचन करून तीन दिवसात 1350 जोडशब्दांचा ” माझा जोडशब्द संग्रह ” तयार केला. यामुळे विद्यार्थीनचे, वाचन, लेखन, मनन, आणि चिंतन झाले. यातून शब्द संग्रह कसा करायचा याचे ज्ञान त्यांना मिळाले, विशेष म्हणजे संपूर्ण मराठी पुस्तकातील सर्व पाठ, कविता विद्यार्थीनी बारकाईने वाचन करून हा जोडशब्द शब्द संग्रह तयार केला. त्यामुळे विद्यार्थीना जोडशब्द कसे लिहायचे याचे ज्ञान हि झाले. आणि हा जोडशब्द संग्रह त्यांच्याजवळ कायम स्वरूपी संग्रही राहणार आहे याचा त्यांना खूप आनंद झाला. हा ” माझा जोडशब्द संग्रह ” तयार करण्यासाठी विद्यार्थी मार्गदर्शन, प्रेरणा साहित्यिक श्री यशवंत चंदनशिवे ( मराठी विषय शिक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली शब्द संग्रह विद्यार्थीनी तयार केला. या सर्व पाचवीतील विद्यार्थीनचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार संचालिका सौ.सविता शहाजी जाधव, श्री. यशवंत चंदनशिवे यांनी केले. माझा जोडशब्द संग्रहात प्रथम कु.विराज प्रविण देवकर, व्दितीय कु.प्रणव कालिदास रवळे, तृतीय कु.आकांक्षा दशरथ पवार, उत्तेजनार्थ कु.पृथ्वीराज शिवाजी मुर्ट, कु.संस्कृती अभिजीत लोखंडे, कु.सोम जयराम लोणचे, कु.संस्कार परमेश्वर देवकर, कु.गौरी विठ्ठल धवन, कु.प्रसाद अनिल गोरे,कु.गौरव पांडूरंग कुंभार या विद्यार्थीनचे कौतुक ,सत्कार केला. तर या विद्यार्थीनचे अभिनंदन प्राचार्य श्री. शहाजी जाधव, सर्व शिक्षकवृंदानी ही केले.