केंद्र सरकारने अॅड. सनिल क्षिरसागर यांची नोटरी म्हणून नियुक्ती जाहीर
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

केंद्र सरकारने अॅड. सनिल क्षिरसागर यांची नोटरी म्हणून नियुक्ती जाहीर
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा गावाचे सपुत्र जिल्हा सत्र न्यायालय पुणे येथे वकिली करत असलेले तसेच पुणे जिल्हा बार असोसिएशनचे मांजी कार्यकारणी सदस्य ॲड.सुनील क्षीरसागर यांची भारत सरकार नोटरी पदी नियुक्ती केंद्र सरकारने गुरुवारी ता.१४ रात्री नियुक्तीची यादी जाहीर केली आहे. वकील वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
नोटरी पब्लिक ऑटर्नी म्हणून वकील यांना ओळखले जाते. ते कायदेशीर व्यावसायिक आहेत. काही कायदेशीर कार्ये करण्यासाठी अधिकृतपणे स्वाक्षरी पाहणे, शपथ घेणे व कागदपत्रे प्रमाणित करणे व व्यवहारांची वैधता प्रमाणित करण्याचा अधिकार आहे.
वकिली व्यवसायात पदार्पण केल्या नंतर १० वर्षाचा अनुभव व ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर केले होते. त्यांच्या ऑनलाइन मुलाखती झाल्या. मुलाखती देलेल्या ॲड सुनील शिरसागर यांची नोटरी पदी नियुक्ती झाली आहे. असे नोटरी ॲड सुनील शिरसागर यांनी सांगितले.
रजिस्टरमध्ये नोंद केलेली नोटरी म्हणजेच रजिस्टर्ड नोटरी समजली जाते. प्रत्येक नोटरीला आलेला दस्त आपल्या रजिस्टर मध्ये नोंद करणे कायदेशीर बंधनकारक आहे. प्रत्येक नोंद दस्तावर नोंदणी नंबर लिहिणे आवश्यकती तिकीटे लावावी लागतात.
नोटरी पदी नियुक्त झालेल्या वकिलांचे सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
‘ग्रामीण भागात विविध प्रमाण पत्र व दाखले प्रमाणित करण्यासाठी नोटरी वकिलांची गरज असते. सध्यस्थितीत नोटरी धारक वकिलांची संख्या फारच कमी होती. केंद्र सरकारने मोठ्याप्रमाणात नोटरी धारक नियुकत्या केल्यामुळे नागरिक, विध्यार्थी व व्यावसायिकांना सोय होणार आहे.’
अॅड. सनिल क्षिरसागर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.