हारणी माध्यम प्रकल्प (काटगांव) मधुन विनापरवाना काळी मातीचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

हारणी माध्यम प्रकल्प (काटगांव) मधुन विनापरवाना काळी मातीचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार
तुळजापूर : प्रतिनिधी
हारणी माध्यम प्रकल्प (काटगांव) मधुन विनापरवाना काळी माती काढुन दैनंदीन लाखो रुपयाचे विक्री करणारे विरुध्द कार्यवाही करणे बाबत दि.१३ मार्च रोजी सामाजिक कार्यर्के बंडोपंत गोरख चव्हाण यांनी तहसीलदार अरविंद बोळंगे यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात असे नमूद केले आहे की, तुळजापूर तालुक्यतील काटगांव शिवारामधील हारणी मध्यम प्रकल्प मध्ये पुढील प्रमाणे गावे दिडेगांव, काळेगांव, नांदूरी, चव्हाणवाडी, येथे खुप मोठया प्रमाणात गाळ (काळी) माती काढुन विक्री केली जात आहे व दैनदिन लाखो रुपयो मिळवत आहेत ज्या शेतकरीचे जमीन (शेती) तलावमध्ये गेलेली आहे. त्यांना फक्त त्याच्याच नावाने शेतामध्ये माती टाकण्यासाठी आपल्या कार्यालयात मार्फत परवानगी देण्यात आलेली आहेत. तरी हे शेतकरी आपल्या कार्यालयाकडुन परवानगी काढुन गावामधील व बाहेरगावी शेतकरी यांना गाळ (काळी मातीचे) 1500 रुपये दर एक हायवाचे पैसे घेवुन विक्री करीत असुन माती टाकणारे शेतकरी यांचे खुप प्रमाणात आर्थीक नुकसान करीत आहेत. ज्या शेतकरी यांची शेतजमीन हरणा मध्यम प्रकल्पामध्ये गेलेली आहे त्यांना आपल्या कार्यालयामध्युन त्यांच्या शेतामध्ये गाळ माती उपसा करणेसाठी परवानगी दिलेली जाते ते शेतकरी ती परवानगी घेवुन दुसऱ्या शेतजमीन गट नं. मधील गाळ (माती) उपसतात व शासनाची दिशाभुल करतात.तसेच टेकेदारांना (एजेन्ट) लोकांना हातशी धरुन शेतजमीनीतील गाळ (माती) उपसुन दुसऱ्या शेतकरी यांना खुप मोठ्या प्रमाणात विक्री करुन संगनमत करुन ठेकेदार (एजन्ट) दैनंदिन लाखो रुपये कमवतात. तसेच शेतरस्ते व डांबरी रस्ते हे पुर्ण खराब होत आहेत. आज रोजी ही वरील नामे सर्व ठिकाणी 10 टायर, 6 टायर हायवा 210 पोकलेन मशिन खुप मोठ्या प्रमाणत चालु आहेत.तसेच ज्या शेतकऱ्यांना शेतामध्ये गाळ (माती) टाकण्या करीता 5 किलो मिटरला 1700 रुपये एक ट्रिपला लागतात. तिथे हे एजन्ट लोक व शेतकरी 3500 रु. घेतात व गाळ (माती) टाकणेसाठी शेतकऱ्यांचे खुप मोठ्या प्रमाणात आर्थीक नुकसान करुन ठेकेदार (एजन्ट) लोक हे स्वतःचा फायदा करुन घेत आहेत.तरी संबंधित अधिकाऱ्यांनी सदरील शेतकरी, ठेकेदार (एजन्ट) यांच्यावर व त्यांच्या वाहनावर योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी असे एका लेखी निवेदनाद्वारे इशारा दिला आहे.अन्यथा आपल्या तहसील कार्यालय तुळजापुर समोर उपोषण करण्यात येईल या निवेदनावर बंडोपत गोरख चव्हाण यांचा यांची स्वाक्षरी आहे
माहितीस्तव
सहाय्यक अभियंता श्रेणी-1, धाराशिव पाटबंधारे उपविभाग, क्रं. 6 कार्यालय, तुळजापुर यांना पण निवेदन देण्यात आले आहे.