भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी शिंदे,सचिवपदी माटे
पत्रकार-गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
लोहारा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीच्या अध्यक्षपदी प्रितम शिंदे तर सचिवपदी तानाजी माटे यांची निवड करण्यात आली.
मंगळवारी दि.१२ रोजी बाळू शिंदे यांच्या निवासस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीकांत कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती.यावेळी जयंती समिती गठीत करण्यात आली.उपाध्यक्षपदी अक्षय माटे,कोषाध्यक्षपदी शैलेश कांबळे,मिरवणूक प्रमुखपदी निवृत्ती थोरात तर सल्लागारपदी उत्तरेश्वर उपरे, श्रीकांत कांबळे यांची निवड करण्यात आली.
मागील वर्षी अतिशय शांततेत व योग्य नियोजन करून जयंती साजरी केल्याबद्दल सर्व कार्यकारिणीचे आभार मानले. तर नुतन पदाधिकारी यांचे अभिनंदन केले. बैठकीला नितीन वाघमारे,मोहन वाघमारे
स्वप्नील माटे,जिंदा वाघमारे,नीळकंठ कांबळे,अतुल कांबळे,राजपाल वाघमारे,सुमित कांबळे,कार्तिक कांबळे,विनोद थोरात,संदीप कांबळे,बालाजी कसबे,संतोष वाघमारे,तात्याराव कांबळे,बाळू शिंदे,रोहित शिंदे,ऋषिकेश कांबळे,सागर थोरात ,अजय कसबे उपस्थित होते.उपस्थितांचे आभार मानून बैठकीची सांगता करण्यात आली.