
लोहारा-प्रतिनिधी
शंकरराव जावळे पाटील कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय लोहारा येथे महिला सबलीकरण कक्ष व अंतर्गत तक्रार निवारण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दि.११ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डॉ. महानंदा मोरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमांमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 व महिला सबलीकरण या विषयावर व्याख्यान आयोजित केले. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक अंतर्गत तक्रार निवारण समिती प्रमुख डॉ.छाया कडेकर यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली. त्यानंतर अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या सदस्या डॉ. पार्वती माने यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना त्यांनी महिला दिन व महिलांचे सबलीकरण याविषयी मत मांडले. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेषेराव जावळे यांच्या मार्गदर्शनानुसार संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक डॉ. मोरे महानंदा, भानुदासराव चव्हाण महाविद्यालय, लोहारा यांनी मुलींना सखोल असे मार्गदर्शन करत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 व त्या अनुषंगाने मुलींची भूमिका स्पष्ट केली. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सर्वांसाठी किती महत्त्वाचे आहे. यातून मुलींनी स्वतःला सक्षम बनवून आपल्या समाज व आपल्या राष्ट्राचा विकास घडवून आणायचा आहे. त्यांनी आपल्या भाषणात भारतातील अनेक प्रतिभाशाली महिलांचे उदाहरण आणि आदर्श मुलींसमोर ठेवून त्यांनी त्यांच्यासमोर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील अनेक महत्त्वपूर्ण घटकाविषयी मार्गदर्शन केले. यानंतर प्रा. डॉ. मनोज सोमवंशी यांनी आभार मांडले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील मोठ्या संख्येने विद्यार्थिनीउपस्थित होत्या. अशाप्रकारे कार्यक्रम संपन्न झाला.