महालिंगरायवाडी जिल्हा परिषद शाळेने तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकाविल्याबद्दल महाराष्ट्र पत्रकार संघाकडून शाळेचा सत्कार
Post-गणेश खबोले

उमरगा-प्रतिनिधी
महालिंगरायवाडी ता.उमरगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत तालुका स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविल्याबद्दल महाराष्ट्र पत्रकार संघाकडून त्यांचा सोमवार (दि.११) रोजी सत्कार करण्यात आला.यावेळी शाळेतील मुख्याध्यापक ईश्वर नांगरे, सहशिक्षक यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.महेश मोटे,योगेश पांचाळ,मनोज हावळे यांनी शाळेस सदिच्छा भेट दिली.या छोटया गावातून पर्याप्त सुविधा नसताना प्रतिकूल परिस्थितीतही शाळा गुणवत्तापूर्ण व भिंतीबरोबरच विद्यार्थीही बोलके असल्याबद्दल कौतुक केले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर नांगरे यांनी शाळेत चालणाऱ्या वैविध्यपूर्ण उपक्रमांची माहिती पत्रकार बांधवांना दिली. यावेळी काही विद्यार्थ्यांनी प्रातनिधिक स्वरूपात स्वरचित कविता सादर केल्या व पंजाब राज्याविषयीचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाप्रसंगी डॉ.महेश मोटे यांनी शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर नांगरे यांचा आदर्श व उपक्रमशील मुख्याध्यापक शाळेस लाभले म्हणूनच हे अद्वितीय यश मिळाले, असे गौरवोद्गार काढून त्यांचे विशेष अभिनंदन केले. शाळेत घेतले जाणारे विविध उपक्रम व गुणवत्ता विकासाचे कार्य म्हणजेच देशाचे उज्वल भवितव्य घडवण्याचे कार्य या शाळेतून घडत आहे, असे मत व्यक्त केले. भविष्यात चांगली पिढी निर्माण करण्याचे सामर्थ्य या शाळेतून घडविले जात आहे.प्रथमच पत्रकार बांधवांनी येऊन शाळेच्या कार्याची दखल घेतली.अशी भेट दिल्याने नक्कीच शाळा व गावासाठी प्रेरणादायी व अभिमानास्पद बाब असल्याची प्रतिक्रिया मुख्याध्यापकांनी यावेळी नोंदवली.सहशिक्षीका किरण चौधरी,निर्मला यादव,निर्मला भोसले आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक रब्बानी मुल्ला यांनी केले.सूत्रसंचालन परमेश्वर ननवरे तर आभार संगिता डोकडे यांनी मानले.