धानुरी येथे कुस्ती संकुल व व्यायाम शाळेचे भूमिपूजन,आ चौगुले यांच्या प्रयत्नांतुन निधी मंजूर
Post -गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील धानुरी येथे मा खा रविंद्र गायकवाड यांच्या संकल्पनेतून व शिवसेना पक्ष उपनेते,उमरगा लोहारा आ.ज्ञानराज चौगुले यांच्या विकास निधीतून कै मनोहर साळुंके कुस्ती संकुल व व्यायाम शाळां बांधकाम करण्यासाठी १५ लक्ष रूपये निधी उपलब्ध करून दिला.शिवसेना तालुका उपप्रमुख परमेश्वर साळुंके व संदीपान बनकर यांच्या हस्ते दि.९ रोजी भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी पै महादेव गोविंद जाधव,दयानंद साळुंके,भागवत बनकर,सरपंच प्रविण थोरात,लक्ष्मण तात्या सुर्यवंशी,शिवहारी साळुंके,लक्ष्मण भागवत सुर्यवंशी,गणेश मारुती जाधव,राम मुसाडे,आरिफ देशमुख,रविंद्र साळुंके,महेश साळुंके,गणेश जाधव, अब्बास शेख,शिवाजी बुरटुकणे,वसंत साळुंके,व्यंकट यादव,बबन बाबर,सुभाष राठोड,तातेराव साळुंके,मोहन बाबर ,गणेश वाळके,सुभाष वाळके,युवराज बनकर,बालाजी सुरवसे,सोमनाथ फुलसुंदर,रामेश्वर कारले,आरून हावळे,दिलीप बाबर,अभिमान वडजे,संजय बुरटुकणे,बलभिम सुरवसे,बालाजी मुसाडे, तानाजी बाबर आदी उपस्थित होते.