ब्रेकिंग
दस्तापूर जि प प्राथमिक शाळा शालेय समिती अध्यक्षपदी स्वामी,उपाध्यक्षपदी डावरे
Post -गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील दस्तापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शालेय समिती व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सिध्दप्पा स्वामी तर उपाध्यक्षपदी भैय्या डावरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
नवनिर्वाचित समितीमध्ये सहा महिला सदस्य व पाच पुरुष सदस्य, एक ग्रामपंचायत सदस्य व सहशिक्षक तसेच शिक्षणतज्ज्ञ म्हणून मा.सैनिक रतन स्वामी यांची निवड करण्यात आली.यावेळी उपसरपंच सोमनाथ पाटील, धोंडिराम गडदे,महादेव वाकळे,धोंडिराम मदने,प्रदीप चव्हाण,गणेश गडदे,शिवलिंग स्वामी,नागेश कलशेट्टी,संजय एकीले,शंकर डोंगरे,धनाजी जाधव,जयेश सुर्यवंशी, व पालकवर्ग,सहशिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.