ब्रेकिंगमहाराष्ट्र
युवासेनेच्या बीड जिल्हा संपर्क विस्तारक पदी प्रतिक रोचकरी यांची नियुक्ती
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

युवासेनेच्या बीड जिल्हा संपर्क विस्तारक पदी प्रतिक रोचकरी यांची नियुक्ती
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेना विस्तारक पदी नियुक्ती जाहीर केली आहे, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
बीड जिल्हा संपर्क विस्तारक तिर्थ क्षेत्र तुळजापूर येथील प्रतीक राजकुमार रोचकरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्ती मुळे धाराशिव जिल्हा व बीड जिल्ह्यातील कैतुकाचा वर्षाव होत आहे.