शिवसेना अध्यात्मिक सेनेच्या मराठवाडा सहसमन्वयकपदी विनोद सोंजी तर शाक्त संप्रदाय राज्य समन्वयकपदी अतुल मलबा
Post-गणेश खबोले

तुळजापूर -प्रतिनिधी
शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदेसाहेब यांच्या प्रेरणेने व खासदार डाॅ. श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच संपुर्ण महाराष्ट्रभर धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षयजी महाराज भोसले यांनी हिंदुधर्म जागरण होण्याकरीता भक्तीशक्ती संवाद यात्रा काढली होती.
एकनाथ शिंदेसाहेबांनी नुकत्याच शिवसेनेच्या अध्यात्मिक सेनेच्या राज्यभरातील निवडी जाहिर केल्या.यात श्री तुळजा भवानी मातेचे मुख्य भोपे पुजारी विनोद सोंजी यांची मराठवाडा सहसमन्वयकपदी तर शाक्त संप्रदाय राज्य समन्वयकपदी अतुल मलबा यांची निवड करण्यात आली.
या निवडीचे पालकमंत्री डाॅ.तानाजीराव सावंत,आमदार ज्ञानराज चौगुले,मराठवाडा संपर्कनेते आनंदजी जाधव,लोकसभा संपर्कप्रमुख रविंद्र गायकवाड,सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम,अनिल खोचरे,जिल्हाप्रमुख सुरज महाराज साळुंके,दत्ता आण्णा साळुंखे,मोहन पनुरे,
उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके,सुरज कोठावळे,
अभिमान खराडे,अविनाश माळी,तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील,संभाजी पलंगे,बापू भोसले यांनी अभिनंदन केले.