अभिलेख कार्यालयातील या प्रकरणात गुंतलेल्यावर कायदेशीर कडक कार्यवाही करण्यात यावी – जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

अभिलेख कार्यालयातील या प्रकरणात गुंतलेल्यावर कायदेशीर कडक कार्यवाही करण्यात यावी – जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापुर येथील न. भु. क्र. 3195 मध्ये खाडाखोड करुन चुकीचे क्षेत्र लावले बाबत दि. जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांना व .उप अधीक्षक, उच्च अभिलेख तुळजापुर. यांना
निवेदात असे नमूद केले आहे की,तुळजापूर येथील न.भु.क्र. 3195 हा पापनास गृहनिर्माण सोसायटी मधील नसुन सदर नगर भूमापन क्रमांक पापनास गृहनिर्माण सोसायटी मध्ये दाखविलेले आहे. सदर नगर भूमापन क्रमांकाची आपल्या कार्यालयात नगर भूमापन क्रमांक 3195 ची मूळ मिळकत पत्रिकेची नक्कल काढली असता असे निदर्शनास येते की, नगर भूमापन क्रमांक 3195 मध्ये मुळ क्षेत्र कट करुन दूसरे क्षेत्र टाकण्यात आलेले आहे. तसेच दिनांक २९/१२/१९९२ रोजीची नोद मंजुर झालेली आहे मंजुर झालेनंतर सदर नोंदीच्या खाली इतर हस्ताक्षरामध्ये नोंद घेवुन सदरची नोद मुळ नोंदीमध्ये घालणेचा प्रयत्न केला आहे. आपण जर सदर मिळकत पत्रिकेची पाहणी केली असता सदरच्या बाबी दिसून स्पष्टपने दिसुन येतील.
तरी सदर नोंदी बाबत व खाडाखोड बाबत आपल्या कार्यालयाकडून सखोल चौकशी करुन सदर नोंदी रद्द करुन या प्रकरणात गुंतलेल्यावर कायदेशीर कडक कार्यवाही करण्यात यावी अस एका लेखी निवेदनाद्वारे देण्यात आले आहे. या निवेदनावर आम आदमी पार्टीचे तुळजापूर शहराध्यक्ष किरण यादव यांची स्वाक्षरी आहे.